भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 06:20 AM2020-08-31T06:20:47+5:302020-08-31T06:20:58+5:30

भाजपाचे शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीवरून मोठे राजकारण रंगले होते. शहराध्यक्ष पदासाठी किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा संधी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्यामुळे संधी मिळाली नाही.

Internal strife within the BJP is on the rise | भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

googlenewsNext

औरंगाबाद : भाजपाची शहर आणि जिल्हा कार्यकारिणी सहा महिन्यांनंतर जाहीर झाली. या कार्यकारिणीत शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना टीम करण्यासाठी स्वातंत्र्य न देता वरिष्ठ नेत्यांनी दबाव टाकून स्वत:च्या समर्थकांना कार्यकारिणीवर घेण्यास भाग पाडल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचे पडसाद कार्यकारिणी जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेत उमटले. शहराध्यक्ष संजय केणेकर हेच पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीवरून मोठे राजकारण रंगले होते. शहराध्यक्ष पदासाठी किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा संधी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्यामुळे संधी मिळाली नाही. यानंतर त्यांनी भाजपाला रामराम करत शिवसेनेला जवळ केले. ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडतानाही विजय औताडे यांच्या नावाला माजी विधानसभाध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे यांचा विरोध होता. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यामुळे औताडे यांची वर्णी लागली. यानंतर शहर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर करणे अपेक्षित असताना सहा महिन्यांपासून नावांवर एकमत होत नसल्यामुळे जाहीर केली नाही. शहर कार्यकारिणीत सहभागी होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे यांच्या शिफारशी मोठ्या संख्येत आल्याने शहराध्यक्षांना मनाप्रमाणे कार्यकारिणी बनविता आली नसल्याची कुजबूज भाजपच्या कार्यालयात सुरू होती. या सर्व राजकारणामुळे नाराज शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी कार्यकारिणी जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेला दांडी मारली. त्याचवेळी शहरातील आ. सावे, शिरीष बोराळकरांसह इतर पदाधिकारीही अनुपस्थित होते. खा. डॉ. कराड यांनीच प्रसिद्धीपत्रक दिले. तसेच मी ग्रामीणचा जिल्हा प्रभारी असल्यामुळे उपस्थित असल्याचे स्पष्ट केले. शहर कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस या पदांवर केंद्रीय मंत्री दानवे, आ. सावे समर्थकांचीच वर्णी लागल्याचे दिसून येते. भाजपत मागे-पुढे करणाऱ्यांना पदे वाटली जात असल्याची प्रतिक्रिया एका पदाधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Web Title: Internal strife within the BJP is on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.