सिडकोतील अंतर्गत जलवाहिनी पुन्हा फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 09:22 PM2019-09-07T21:22:09+5:302019-09-07T21:23:17+5:30
सिडकोतील एमआयजी, एलआयजीसह लगतच्या नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत जलवाहिनी शुक्रवारी पुन्हा फुटली.
वाळूज महानगर: सिडकोतील एमआयजी, एलआयजीसह लगतच्या नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत जलवाहिनी शुक्रवारी पुन्हा फुटली.
येथील एमआयजी, एलआयजीसह सारा किर्ती, सारा गौरव, सारा वृंदावन, जिजामातानगर, साईनगर भागाला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत जलवाहिनी आठवडाभरापूर्वी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहून गेले होते. यावेळी प्रशासनाने जलवाहिनीची दुरुस्ती केली होती.
शुक्रवारी सकाळी या भागाला पाणी सोडल्यानंतर सिडको जलकुंभ ते शिवाजी चौक मुख्य रस्त्यावरील साईनाथ हौ.सोसायटी जवळ जलवाहिनी पुन्हा फुटली. जवळपास दोन तास या ठिकाणी पाणी वाहत असल्याने बंद पोलीस चौकीलगत तळे साचले होते. या वसाहतीचा पाणीपुरवठा बंद केल्यानंतर सुरु असलेली गळती थांबली.
जलवाहिनी फुटीच्या प्रकारामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने प्रशासनाविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.