इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:07 AM2017-10-22T01:07:51+5:302017-10-22T01:07:51+5:30

: येत्या २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत दुसरे इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे

 International Buddhist Festival on 29 October in Aurangabad | इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत

इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : येत्या २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत दुसरे इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जगभरातील विविध बौद्ध राष्ट्रांतील प्रमुख भिक्खू व मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना भन्ते एम. धम्मज्योती थेरो म्हणाले की, जागतिक पातळीवर प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून औरंगाबाद शहराची ओळख निर्माण करून देणे, या परिसरातील अजिंठा, वेरूळ लेण्यांचा वारसा जोपासून येथे उद्योगधंद्यासाठी आंतरराष्ट्रीय दारे उघडी करून देणे, हा येथे इंटरनॅशनल फेस्टिव्हल आयोजित करण्यामागचा उद्देश आहे. यंदा या फेस्टिवलचे उद्घाटन श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या हस्ते होणार आहे.
या माध्यमातून भारत व श्रीलंका या दोन्ही राष्ट्रांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक संबंध मजबूत होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत.
विश्वविख्यात अजिंठा, वेरूळ आणि शहरातील बुद्धलेणीच्या संवर्धनासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना समारंभात निवेदन सादर केले जाणार आहे. संग्रामनगर उड्डाणपुलानजीक जंबिदा लॉन्सवर विशाल सभामंडपात आयोजित या फेस्टिव्हलमध्ये भदन्त खेमधम्मो महाथेरो, भदन्त बोधिपालो महाथेरो, भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो, भदन्त उपगुप्त महाथेरो, भदन्त यशका इरापाडल महाथेरो, भदन्त कुसल महाथेरो (म्यानमार), भदन्त आयुपाल महाथेरो (म्यानमार), भदन्त चंदिमा (बांगलादेश), भदन्त दीपवस, भदन्त कुवेन, भदन्त धनकाऊ (थायलंड), भदन्त आर्या प्रज्ञा, आर्या किम होग (व्हिएतनाम), भदन्त ला मा (थायलंड), भदन्त डॉ. एम. सत्यपाल आदींसह श्रीलंका येथील १० ते १५ भिक्खू सहभागी होणार आहेत. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी भिक्खू संघ, तसेच मनीष बागूल, प्रफुल्ल ढेपे हे कार्यवाह म्हणून परिश्रम घेत आहेत.

Web Title:  International Buddhist Festival on 29 October in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.