स्टील उद्योगातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 07:05 PM2019-07-26T19:05:21+5:302019-07-26T19:07:25+5:30

उत्पादन निर्यात होण्याचे प्रमाणही मोठे असेल

International technology in the steel industry comes in Aurangabad | स्टील उद्योगातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान औरंगाबादेत

स्टील उद्योगातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान औरंगाबादेत

googlenewsNext
ठळक मुद्देएनएलएमकेचा पूर्ण प्लांट ऑटोमॅटिक ऑरिक सिटीऐवजी बिडकीनमध्ये या उद्योगाला जागा

औरंगाबाद : रशियातील सर्वात मोठी व जगातील २० व्या रँकवर असणारी नोव्होलिपटेस्क स्टील कंपनी (एनएलएमके) औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रियल पार्कमध्ये येण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. स्टील उद्योगातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान या उद्योगाच्या निमित्ताने औरंगाबाद येणार आहे. इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरला लागणारे स्टील एनएलएमकेच्या जगभरातील प्रकल्पांमध्ये तयार होते. तेच उत्पादन आता औरंगाबादेत होणे शक्य आहे. 

ऑरिक सिटीऐवजी बिडकीनमध्ये या उद्योगाला जागा देण्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती उद्योग वर्तुळातून पुढे आली आहे. औरंगाबाद-जालना हे स्टील उद्योगाचे हब म्हणून ओळखले जात असले तरी कन्स्ट्रक्शन्स क्षेत्रासाठी लागणारेच स्टील येथे उत्पादित केले जाते. एनएलएमकेमुळे स्टील उद्योगातील नवीन  तंत्रज्ञान पूर्ण मराठवाड्याला मिळेल. देशभरातील इलेक्ट्रिकल्स पायाभूत सुविधांची गरज मोठ्या प्रमाणात पुरविण्याची क्षमता या उद्योगात आहे. मुंबई-दिल्ली-इंडस्ट्रीयल-कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये अँकर प्रोजेक्टसाठी सुरू असलेले प्रयत्न या उद्योगामुळे यशस्वी होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ८०० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ६ हजार कोटींची गुंतवणूक हा उद्योग येथे करणार आहे. 

रोजगाराच्या संधी वाढतील
मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य तथा उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले, या उद्योगामुळे निर्यातीचा टक्का वाढेल. शिवाय नवीन तंत्रज्ञान येथे येईल. प्रकल्प आॅटोमेटिक असला तरी मटेरियल ओरिएन्टेड असेल. उत्पादन करताना, उत्पादन हाताळताना लागणारी यंत्रणा मनुष्यबळाची असेल. तसेच पुरवठादारांची साखळी, जड ट्रान्स्पोर्ट व लॉजिस्टीक, वेअर हाऊस, डेपो यातूनही थेट रोजगाराच्या संधी मिळतील. इलेक्ट्रिकल, वीज क्षेत्रासाठी लागणारे स्टील आयात करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. जागतिक पातळीवरील उत्पादन या उद्योगामुळे वीजक्षेत्राला मिळेल. तसेच येथील निर्यातदरही वाढेल.

पर्यावरणपूरकतेची अपेक्षा
स्टील उत्पादन करणाऱ्या उद्योगातून हवेचे प्रदूषण होण्याची शक्यता जास्त असते; परंतु एनएलएमके हा आंतरराष्ट्रीय उद्योग आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक असाच औरंगाबादेतील प्रकल्प असेल. हवेचे प्रदूषण स्टील उद्योगांसाठी एक आव्हान असते. तो एक संवेदनशील विषय आहे. जागतिक पातळीवरील गु्रप असल्यामुळे पर्यावरणपूरकतेबाबत ते सतर्क असतील. जागतिक पातळीवरील पर्यावरणपूरक तंत्रज्ञान कंपनी घेऊन येईल, त्याचा येथील स्टील उद्योगांनादेखील फायदा होईल, असे मत उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

Web Title: International technology in the steel industry comes in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.