जगाने वाखाणली या मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरची बिझनेस शैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 07:52 PM2021-03-08T19:52:13+5:302021-03-08T19:52:52+5:30

International Women's Day : भारतीयांसाठी जगभरात ओळख निर्माण करून देणारे आणि अतिशय सन्मानाचे असणारे नॉन रेसिडेंट इंडियन ऑफ दी ईअर अवॉर्ड, वूमन लीडरशिप अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन ऑइल ॲण्ड गॅस सेक्टर, स्पेशल ॲलोकेशन ऑफ ए जर्मन एमएनसी स्टॉक अवॉर्ड, असे अनेक महत्त्वपूर्ण अवॉर्ड अंजू यांनी पटकाविले आहेत.

International Women's Day : The business style of the managing director of this multinational company praised by the world | जगाने वाखाणली या मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरची बिझनेस शैली

जगाने वाखाणली या मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरची बिझनेस शैली

googlenewsNext

औरंगाबाद : जेएनईसी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेत शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीनिमित्त त्यांनी थेट सिंगापूर गाठले. सिंगापूरच्या मल्टिनॅशनल कंपनीपासून सुरू झालेला अंजू जसवाल यांचा प्रवास आता त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना थेट जगभरात ओळख मिळवून देणारा ठरला आहे.

वडील लष्करी सेवेत वरिष्ठ अधिकारी असल्याने अंजू यांचे शालेय शिक्षण नेहमीच वेगवेगळ्या गावांमध्ये झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण मात्र त्यांनी औरंगाबाद येथून घेतले. सध्या अंजू एका मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. याआधी अंजू यांनी एका जर्मन मल्टिनॅशनल कंपनीसाठी रिजनल आणि ग्लोबल हेड, अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कोणतेही काम एकाग्रता आणि आत्मविश्वासाने करणे ही अंजू यांची वैशिष्ट्ये नेहमीच बिझनेस जगताकडून वाखाणली गेली आहेत. भारतीयांसाठी जगभरात ओळख निर्माण करून देणारे आणि अतिशय सन्मानाचे असणारे नॉन रेसिडेंट इंडियन ऑफ दी ईअर अवॉर्ड, वूमन लीडरशिप अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन ऑइल ॲण्ड गॅस सेक्टर, स्पेशल ॲलोकेशन ऑफ ए जर्मन एमएनसी स्टॉक अवॉर्ड, असे अनेक महत्त्वपूर्ण अवॉर्ड अंजू यांनी पटकाविले आहेत.

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे, सगळ्यात आवश्यक आहे. कारण जेव्हा आव्हाने येतील, तेव्हाच त्यांचा सामना करायलाही शिकाल. तुमच्या गुणवत्ता, कौशल्याला कधीच बंदिस्त करून ठेवू नका. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा विकास करा आणि परिपूर्ण आयुष्य जगा, असा संदेश अंजू यांनी दिला.

ते गणेश मंदिर अजूनही आठवते
औरंगाबादच्या असंख्य आठवणी कायमच माझ्या सोबत असतात. आमच्या वेळी असणारे प्राचार्य दाभाडे यांच्यासह अनेक प्राध्यापकांची नेहमीच आठवण येते. आमच्या कॉलेजजवळ एक गणेश मंदिर होते. परीक्षेच्या आधी त्या मंदिरात आम्ही आवर्जून जाऊन यायचो. आजही एखादी परीक्षा आली की, ते गणेश मंदिर हमखास आठवते, अशी आठवण अंजू यांनी सांगितली.

Web Title: International Women's Day : The business style of the managing director of this multinational company praised by the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.