लोकसभेत लोकप्रतिनिधींची संख्या वाढवून हिंदुत्ववादी सत्ता राखण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:02 AM2021-08-17T04:02:26+5:302021-08-17T04:02:26+5:30

औरंगाबाद : सध्या लोकसभेतील ५४३ खासदारांची संख्या बदलून १ हजार करण्यात येणार आहे. त्यात उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य ...

Intrigue to maintain pro-Hindu power by increasing the number of people's representatives in the Lok Sabha | लोकसभेत लोकप्रतिनिधींची संख्या वाढवून हिंदुत्ववादी सत्ता राखण्याचा डाव

लोकसभेत लोकप्रतिनिधींची संख्या वाढवून हिंदुत्ववादी सत्ता राखण्याचा डाव

googlenewsNext

औरंगाबाद : सध्या लोकसभेतील ५४३ खासदारांची संख्या बदलून १ हजार करण्यात येणार आहे. त्यात उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात ६०० ते ६५० खासदारांच्या जागा द्यायच्या आणि दक्षिण, पूर्वांचल भागातून ३५० ते ४०० खासदारांच्या जागा देण्याचा डाव आहे. यातूृन कायम हिंदू पट्ट्यातील संख्येच्या आधारावर हिंदुत्ववादी सरकार दिल्लीत कायम राहील, असा डाव आखला जात असल्याचा दावा ज्येष्ठ विचारवंत तथा राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. यातून देश पुन्हा फाळणीच्या दिशेने जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लोकसंवाद फाउंडेशतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त खासदार केतकर यांचे ' भारत : काल, आज आणि उद्या ' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन रविवारी ऑनलाईन पद्धतीने झाले. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे होते. यावेळी बोलताना खासदार केतकर म्हणाले, लोकसभेतील खासदार एक हजारपर्यंत वाढविणे हे भाजपचे आगामी उद्दिष्ट आहे. भाजपचा पाया भक्कम असलेल्या उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आदी भागातील हिंदू बहुल भागातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढवत कायमस्वरुपी हिंदुत्ववादी सत्ता देशावर राखण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. मात्र यातूनच देशात अस्वस्थता वाढणार आहे. काश्मीर, पंजाब, तामिळनाडू, मिझोराम, आसाम आदी राज्यातून स्वतंत्र होण्याची मागणी पुढे येऊ शकेल. सध्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या संसदेतील लोकसभेत १ हजार खासदार बसतील, अशी व्यवस्था केली जात असल्याचा दावाही कुमार केतकर यांनी केला आहे. अध्यक्षीय समारोपात डॉ. गव्हाणे यांनी मागील ७५ वर्षांत झालेल्या विकासात्मक कामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी केले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. डॉ. गणेश मोहिते यांनी आभार मानले.

चौकट,

नेहरू -गांधींमुळेच देशाची प्रगती

भारत स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. आता १३५ कोटी झाली आहे. या लोकसंख्येला भारत जगवू शकतो, दोन वेळेचे अन्न देऊ शकतो. हे केवळ ७५ वर्षात झालेल्या प्रगतीमुळेच आहे. स्वातंत्र्यावेळी केवळ १ कोटी लोक मध्यम वर्गात होते. आज ती संख्या ४० कोटीपर्यंत पोहचली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून नियोजनबद्धपणे उच्चशिक्षण संस्था स्थापन केल्या. यातून शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी परदेशात गेले. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून खेडोपाडी आर्थिक कर्जाची उपलब्धता करून दिली. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाले. यातून हरित क्रांती झाली. राजीव गांधी यांच्या तंत्रस्नेही धोरणामुळे भारत जगात संगणक तंत्रज्ञानाचा हब बनला. या धोरणांमुळेच देशातील मध्यम वर्गाची संख्या वाढली, ही देशाच्या प्रगतीची कारणे असल्याचेही खा. केतकर यांनी सांगितले.

Web Title: Intrigue to maintain pro-Hindu power by increasing the number of people's representatives in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.