वन विभागात १० आधुनिक पेट्रोलिंग कार दाखल
By Admin | Published: July 25, 2016 12:50 AM2016-07-25T00:50:03+5:302016-07-25T01:07:13+5:30
औरंगाबाद : वन विभागात १० आधुनिक पेट्रोलिंंग कार दाखल झाल्या असून यामुळे गस्ती पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित मदतीसाठी पोहोचणे शक्य होणार आहे.
औरंगाबाद : वन विभागात १० आधुनिक पेट्रोलिंंग कार दाखल झाल्या असून यामुळे गस्ती पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित मदतीसाठी पोहोचणे शक्य होणार आहे.
वन्यजीवासंदर्भात नागरिकांनी वन विभागाला कळविले असता मदत मिळण्यास विलंब होत असे, या आता कारमुळे जखमी व्यक्तीला लगेच मदत मिळू शकते. वन्यप्राणीही जखमी असल्यास त्यास वाहनातून दवाखान्यापर्यंत नेणे शक्य होणार आहे. वन क्षेत्रातून वन्यजीव पाणी व अन्नाच्या शोधात शहरात येत आहेत. मानवानेच दूरवर त्यांच्या घरापर्यंत अतिक्रमण केल्याने या घटना वारंवार शहरी भागात उद्भवत आहेत.
शहरालगत वन विभागाने पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्याचे प्रयत्न अनेक वेळा असफल झालेले आहेत. एकीकडे शेतकरी ‘आम्हाला बिबट्या दिसला’ असे म्हणतात तर दुसरीकडे वन अधिकारी सांगतात की तो बिबट्या नसून ‘तरस’ असावा. त्यामुळे नागरिकही विश्वास ठेवतात. परंतु काही काळाने या घटनेची पुनरावृत्ती होते. अशा वेळी वन विभागाची मोठी पंचाईत होते. आता पिंजरा घटनास्थळापर्यंत नेता येईल, एवढी जागा पेट्रोलिंग कारमध्ये उपलब्ध करून दिली आहे.
तसेच गाडीवरील वन विभागाचे सिंम्बॉलही वाहनाची ओळख करून देते, ज्या प्रकारे पोलिसांची गस्ती पथकाची व्हॅन दिसली की, सर्वसामान्यांना सुरक्षितता वाटते. त्याच प्रकारे आता वन विभागाच्या या कारमुळे वन मजूर, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढणार आहे.