औरंगाबादेत राज्यस्तरीय दिगंबर जैन संमेलनात ५०० भावी वधू-वरांचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:44 AM2017-12-27T00:44:14+5:302017-12-27T00:44:19+5:30
अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सैतवाल दिगंबर जैन वधू-वर परिचय संमेलनात जवळपास २०० युवक व ३०० युवतींनी आपला परिचय करुन दिला. उद्योजक किंवा व्यापारी नवराही चालेल, असा कल या संमेलनात युवतींमध्ये दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सैतवाल दिगंबर जैन वधू-वर परिचय संमेलनात जवळपास २०० युवक व ३०० युवतींनी आपला परिचय करुन दिला. उद्योजक किंवा व्यापारी नवराही चालेल, असा कल या संमेलनात युवतींमध्ये दिसून आला.
औरंगाबाद येथील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन रिसोड येथील उदयकुमार जोगी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुंबई येथील महावीर घोडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून महामंत्री रमेश रणदिवे, अध्यक्ष जिनदास मोगले, मुख्य प्रवर्तक मंगलाताई गोसावी, कार्याध्यक्ष दिगंबरराव वायकोस, विलास जोगी, गणेश खोबरे, राहुल जोगी आदींची उपस्थिती होती.
आचार्य आर्यनंदीजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने संमेलनास प्रारंभ झाला. प्रारंभी या वधू-वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष जिनदास मोगले व पाहुण्यांनी संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश सांगून राज्यभरातून आलेल्या युवक, युवतींसह त्यांच्या पालकांचे स्वागत केले व जास्तीत जास्त विवाह जुळून यावेत, यासाठी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर बोलावून युवक व युवतींनी आपला परिचय करुन दिला. त्यामुळे रेशीमगाठी जुळण्याची ‘लगीनघाई’ दिवसभर येथे दिसली.
काही युवकांनी घर, आई-वडिलांचा सांभाळ करणारी अनुरुप भावी पत्नी असावी तर काहींनी नोकरीवाली व उच्चशिक्षित युवतींना पसंती दर्शविली. काही युवतींनी निर्व्यसनी, व्यापारी, धार्मिक तर काही युवतींनी उच्चशिक्षित व नोकरीवाल्या भावी पतीला पसंती दाखविली. व्यापारी किंवा उद्योजक पतीला प्रथमच युवतींनी पसंती दर्शविली, हा चांगला बदल यावेळी दिसला. यामुळे हा मेळ जमविण्यासाठी आलेल्या युवक, युवतींसह पालक एकमेकांच्या भेटीगाठी घेत होते. कार्यक्रमासाठी परिचय संमेलनाच्या पदाधिकाºयांसह शोभाताई देशमाने, ज्योती मोगले, ऋषाली जोगी, संदीप वायकोस, सतीश जोगी, ममता अंबेकर, मीनाक्षी उदगीरकर, अजय वायकोस आदींनी परिश्रम घेतले. अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे राष्टÑीय अध्यक्ष दिलीप घेवारे यांनी भावी वधू-वरांना शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त विवाह लावण्याचे आवाहन केले. कार्याध्यक्ष डी.डी. वायकोस यांनी आभार मानून आगामी संमेलनात जास्तीत जास्त विवाह जुळवून साधेपणाने लग्नसोहळे साजरे करण्याचे आवाहन केले.