२०४ नागरिकरांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:05 AM2021-04-23T04:05:26+5:302021-04-23T04:05:26+5:30
अभ्यागतांची संख्या घटली औरंगाबाद : संचारबंदीमुळे सरकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे ॲॅन्टिजन चाचण्या कमी झाल्या आहेत. गुरुवारी ...
अभ्यागतांची संख्या घटली
औरंगाबाद : संचारबंदीमुळे सरकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे ॲॅन्टिजन चाचण्या कमी झाल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात सहा सरकारी कार्यालयात दोन नागरिक पॉझिटिव्ह आढळले. पोलीस आयुक्तालयात १४ पैकी एक, महापालिकेत सहापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
तपासणी नाक्यावर ४९ जण बाधित
औरंगाबाद : शहराच्या तपासणी नाक्यावर गुरुवारी केलेल्या ॲॅन्टिजन चाचणीत ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात चिकलठाणा येथे ३३२ पैकी १२, हर्सूल टी पॉइंटवर २४४ पैकी १८, कांचनवाडी येथे ३२४ पैकी ८, झाल्टा फाटा येथे २९० पैकी ६, नगर नाका येथे ४९८ पैकी ५ पॉझिटिव्ह आढळले.
३१ प्रवासी आढळले पॉझिटिव्ह
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन व विमानतळावर ३१ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बुधवारी त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात रेल्वेस्टेशनवर २१ तर विमानतळावर १० जण बाधित आढळून आले. गुरुवारी ९१ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्याचा अहवाल शुक्रवारी येईल, असे मनपाच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.