४ केंद्रांवरील तपास अहवाल ८ दिवसांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:30 AM2017-09-03T00:30:23+5:302017-09-03T00:30:23+5:30

जालना केंद्रावरील तूर खरेदी प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत ४९ शेतकरी, १८ व्यापाºयांसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Investigation Report on 4 centers in 8 days! | ४ केंद्रांवरील तपास अहवाल ८ दिवसांत!

४ केंद्रांवरील तपास अहवाल ८ दिवसांत!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना केंद्रावरील तूर खरेदी प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत ४९ शेतकरी, १८ व्यापाºयांसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सातोना, परतूर, अंबड आणि तीर्थपुरी येथील नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रांवरील बोगस नावांवर केलेल्या तूर विक्रीचा तपास अहवाल आगामी आठ दिवसांत सादर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना कृषी बाजार समिती आवारात असलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांच्या नावावर व्यापाºयांनीच तूर विक्री केल्याच्या तक्रारींची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास केला. कागदपत्रांची छाननी केल्यानंतर यात ८४०० शेतकºयांची नावे संशयास्पद असल्याचे समोर आले. जालना केंद्रावरील तूर खरेदीचा तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील केंद्रावर शेतकºयांच्या नावे तूर विक्री करणाºया १८ व्यापाºयांसह ४९ शेतकºयांवर चंदनिझरा पोलीस ठाण्यात कलम ४६७, ४६८, ४२०, ४०९, ३४ व जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. एप्रिल व मे महिन्यात ४९ शेतकºयांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ९२ लाख, ५७ हजार ८५९ रुपये किमतीची तूर नाफेड केंद्रावर विकली. पैकी ८४ लाख नऊ हजार ८३३ रुपये ‘आरटीजीएस’द्वारे व्यापाºयांच्या खात्यावर वर्ग केले, असे साहाय्यक निबंधक विष्णू रोडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. जालना केंद्रावरील तुरीचा तपास सुरु असतानाच एक महिन्यानंतर सातोना, परतूर, अंबड आणि तीर्थपुरी येथील केंद्रांवरही अशाच पद्धतीने तूर विक्री झाल्याचे उघडकीस आले. या चारही केंद्रांवरील तुरीचा आढावा शुक्रवारी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title:  Investigation Report on 4 centers in 8 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.