वैजापुरात अँपद्वारे आयपीएलवर सट्टा उघडकीस; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 23:56 IST2022-04-16T23:55:41+5:302022-04-16T23:56:50+5:30
पथकाने वेगवेगळ्या तीन ठिकाणाहून तिघांना ताब्यात घेतले

वैजापुरात अँपद्वारे आयपीएलवर सट्टा उघडकीस; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
वैजापूर- आयपीएल वर सट्टा खेळणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. शहरातील गंगापूर रोडवर नवजिवन काॅलनीतील कृष्णा धुळे नावाच्या एका व्यक्तीचा आरोपींमध्ये समावेश आहे. अन्य दोन जणांची चौकशी सूरू असून यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यानंतर वैजापूर येथे आय पी एल वर सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.तेव्हापासून पोलीस आरोपींच्या शोधात होते.शनिवारी रात्री पोलीस निरीक्षक सम्राट राजपूत, सहाय्यक फौजदार विजय खोकड यांच्या पथकाने वेगवेगळ्या तीन ठिकाणाहून तिघांना ताब्यात घेतले.यातील धुळे हा फायर अँपच्या माध्यमातून सट्टा खेळून संबंधीतांना कोड देत असल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणी तिघांचीही कसून चौकशी सुरू असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.