स्वच्छ भारत अभियानात अनियमितता ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:05 AM2021-03-06T04:05:21+5:302021-03-06T04:05:21+5:30
औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान, हागणदारीमुक्त गावयोजनेतून गावागावांत लावलेल्या फलकांमध्ये अनियमितता झाली असून भ्रष्टाचार झाला. त्याची चौकशी करण्याची मागणी ...
औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान, हागणदारीमुक्त गावयोजनेतून गावागावांत लावलेल्या फलकांमध्ये अनियमितता झाली असून भ्रष्टाचार झाला. त्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य केशवराव तायडे यांनी स्थायी समितीत केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी चौकशी करून कारवाही करण्याचे आश्वासन सदस्यांना दिले.
डॉ. गोंदवले म्हणाले, सदस्यांच्या स्वच्छ भारत अभियानसंदर्भात ज्या काही तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. मात्र, सध्या सुरू असलेल्या माझे कार्यालय सुंदर कार्यालयाच्या उपक्रमातून जिल्ह्यातील कार्यालयांचे रूप पालटले आहे. आता माझे गाव सुंदर गाव उपक्रम सुरू केला आहे. त्यातून गावात अनेक उपक्रम घ्यायचे आहेत. त्यात लोकप्रतिनीधींच्या सहभागाशिवाय ही कामे शक्य नसून त्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
---
शासनाकडून अभियानाची दखल
माझे कार्यालय सुंदर कार्यालय व माझे गाव सुंदर गाव या अभियानांच्या यशाची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेतली गेली आहे. त्यामुळे हे अभियान राज्य शासनाकडून राज्यभर लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय येणार आहे. त्यामुळे आता या उपक्रमाची जबाबदारी आणखी वाढली असून राज्यात सर्वांपेक्षा चांगले काम या योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनीधींच्या सहभागाची गरज आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.