घरात कोठीतील गव्हाला कीड लागली नाही ना? एकदा बघून घ्या, काय करणार उपाय

By प्रशांत तेलवाडकर | Published: October 5, 2023 12:54 PM2023-10-05T12:54:26+5:302023-10-05T12:54:26+5:30

मोंढ्यातही येतोय किडलेला गहू; दुकानातील पोत्यातच किडीने केले गव्हाचे पीठ

Is the wheat in the barn not infected at home? Take a look, what will be the solution | घरात कोठीतील गव्हाला कीड लागली नाही ना? एकदा बघून घ्या, काय करणार उपाय

घरात कोठीतील गव्हाला कीड लागली नाही ना? एकदा बघून घ्या, काय करणार उपाय

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जाधववाडीतील आडत बाजारात सध्या जुन्या गव्हाची आवक होत असून त्यातील अर्ध्याअधिक गव्हाला कीड लागली आहे. पोते उघडताच गव्हाचे पीठ झाल्याचे दिसते. सध्या परिस्थिती तशी असल्याने तुम्हीही वार्षिक धान्य खरेदी करून कोठीत भरलेल्या गव्हाला कीड तर लागली नाही ना? हे एकदा पाहूणच घ्या.

किती क्विंटल दररोज आवक?
जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी दररोज ३०० ते ४०० पोते गहू विक्रीला आणत आहेत. यातील ४५ टक्के गव्हाला कीड लागलेल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे.

शेतकऱ्यांना क्विंटलमागे १५०० रुपयांचा फटका
मी आज कृउबा समितीत १० क्विंटल गहू विक्रीला आणला. माझ्याकडील गहू दर्जेदार असता तर ३२०० ते ३५०० रुपये क्विंटल भाव मिळाला असता. मात्र गव्हाला कीड लागल्याने २००० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला. क्विंटलमागे १२०० ते १५०० रुपये नुकसान झाले.
- आजीनाथ गोडसे, शेतकरी, चौका (फोटो)

गव्हाला का लागली कीड
नवा गहू पूर्वी एप्रिलमध्ये बाजारात येत होता. आता शेतकरी नोव्हेंबरमध्ये रब्बीत गव्हाची पेरणी करतात व फेब्रुवारीत म्हणजे दोन महिने अगोदरच गहू बाजारात विक्रीला आणतात. त्यामुळे दाणे ओलसर असतात, तसेच ते प्लास्टिकच्या गोणीत भरले जातात. ही गोणी गव्हातील ओलसरपणा सुकवत नाही. यामुळे ओलसरपणा तसाच राहून त्याला कीड लागते.
- हरीष पवार, आडत व्यापारी

कीड लागलेल्या गव्हाचे काय करावे
१) एप्रिल, मे दरम्यान ग्राहक गहू खरेदी करतात. घरी नेल्यावर १५ दिवस तो कडक उन्हात ठेवावा. म्हणजे गव्हातील ओलसरपणा जाईल. नंतरच तो गहू कोठीत भरून ठेवावा.
२) गहू भरताना कोठीत लिंबाचा झाडाचा पाला टाकावा, किंवा बाजारात इंजेक्शन मिळते ते कोठीत गव्हात ठेवून द्यावे, त्यामुळे गव्हाला कीड लागत नाही.

आता कीड लागली पुढे काय
१) तुम्ही कोठीमध्ये ठेवलेल्या गव्हाला कीड लागली असेल तर तो गहू उन्हात वाळवून घ्यावा.
२) उन्हामुळे दाण्याबाहेर कीड निघते व मरते.
३) कोठी धुऊन स्वच्छ करावी व २-३ दिवस कडक उन्हात ठेवावी.
४) कीड गेल्यावर पुन्हा गहू कोठीत भरून ठेवावा.

Web Title: Is the wheat in the barn not infected at home? Take a look, what will be the solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.