अक्कल दाढ अन् हुशारीचा संबंध आहे का? या दाढीविषयी गैरसमजच अधिक

By संतोष हिरेमठ | Published: November 2, 2023 07:36 PM2023-11-02T19:36:04+5:302023-11-02T19:39:17+5:30

अक्कल दाढ येणे, ही सर्वसाधारण गोष्ट आहे.

Is there a relationship between wisdom teeth and intelligence? More misconceptions about beards | अक्कल दाढ अन् हुशारीचा संबंध आहे का? या दाढीविषयी गैरसमजच अधिक

अक्कल दाढ अन् हुशारीचा संबंध आहे का? या दाढीविषयी गैरसमजच अधिक

छत्रपती संभाजीनगर : लहान मुलांना जे शेवटचे चार दात येण्यास सुरुवात होते, त्यांना ‘अक्कल दाढ’ असे म्हटले जाते. हे दात कायमस्वरूपी असतात. अक्कल दाढ असे म्हटले जात असले तरी त्यांचा अक्कल, हुशारी आणि बुद्धीशी काहीही संबंध नसतो. उलट चांगले मौखिक आरोग्य असणाऱ्या लोकांनाही त्यांचा त्रास होतो. त्यामुळे त्या काढण्याचीही वेळ ओढवते, असे तज्ज्ञांनी म्हटले.

अक्कल दाढ केव्हा व कशामुळे येते? 
अक्कल दाढ येणे, ही सर्वसाधारण गोष्ट आहे. साधारणपणे वयाच्या अठराव्या वर्षी अक्कल दाढ येते. काही लोकांना ती सरळ म्हणजे सर्वसामान्य येते. मात्र, काहींना अपूर्ण येते, तर काही जणांना वाकडी येते. अशावेळी त्रास होतो.

अक्कल दाढीविषयी गैरसमज
दंत उपचाराच्या भीतीसोबतच अक्कल दाढ काढल्यानंतर व्यक्तीला कायमचे अंधत्व येते, दात कापणे किंवा ते स्वच्छ करण्यामुळे इतर दातांना इजा पोहोचते, असे गैरसमज आजही लोकांमध्ये आहेत.

दात काढला तर दृष्टी कमी होते का?
हा गैरसमज यामुळे पसरला आहे की, पूर्वी लोक वय झाल्यानंतर दात काढायचे. त्या वयात नजर कमी झालेली असतेच. यावरूनच असा गैरसमज झालेला आहे की, दात काढल्यावर नजर कमजोर होते. मात्र, दातांचा आणि नजरेचा काही संबंध नसतो.

दात काढल्यानंतर काय काळजी घ्याल? 
दात, दाढ काढल्यानंतर पाण्याने गुळण्या करू नये. जोरात थुंकू नये. थंड आणि पातळ खावे. ज्यूस पिताना स्ट्रॉ वापरू नये. दंतरोग तज्ज्ञांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्यावी.

अक्कल दाढ येणे सर्वसाधारण
अक्कल दाढ हे नाव यामुळे पडले की, या दाढी साधारणपणे वयाच्या १८व्या वर्षी येत असतात. त्या वयात अक्कल येते, असे पूर्वीचे लोक म्हणायचे. मात्र, त्यामुळे अक्कल दाढ आणि हुशारीचा काही संबंध नसतो. अक्कल दाढ येणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे.
-डॉ. इंदिरा रोजेकर, दंतरोग तज्ज्ञ.

Web Title: Is there a relationship between wisdom teeth and intelligence? More misconceptions about beards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.