‘इस्कॉन’चा गौरी-पौर्णिमा ऑनलाईन उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:04 AM2021-03-28T04:04:12+5:302021-03-28T04:04:12+5:30

भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव दिन व राधाकृष्ण होली उत्सवाच्या निमित्ताने गौर–पौर्णिमा महामहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रविवारी २८ ...

ISKCON's Gauri-Pournima online celebration | ‘इस्कॉन’चा गौरी-पौर्णिमा ऑनलाईन उत्सव

‘इस्कॉन’चा गौरी-पौर्णिमा ऑनलाईन उत्सव

googlenewsNext

भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव दिन व राधाकृष्ण होली उत्सवाच्या निमित्ताने गौर–पौर्णिमा महामहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रविवारी २८ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता 'हरे कृष्णा' कीर्तनाने उत्सवाला सुरुवात होईल. ६.३० वाजता डॉ. गोपालकृष्ण प्रभू हे श्री गौर आविर्भाव कथेचे निरूपण करणार आहेत. त्यानंतर श्री श्री गौर नीताईचा पंचामृत अभिषेक होईल. भक्तांद्वारा बनविलेले १०८ भोग श्रीमूर्तींना अर्पित केले जाईल. तत्पश्चात महाआरती होईल.

उद्या, सोमवारी श्री श्री राधाकृष्ण रंगोत्सव व जगन्नाथ मिश्र उत्सव संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होईल. यावेळी भगवान श्री राधाकृष्णाच्या मूर्तींसोबत रंगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तत्पश्चात महाआरती होईल. रंगोत्सवासाठी नैसर्गिक रंग वापरले जातात, जे फुले, झाडांची पाने, कंदमुळे यांपासून बनविले जाणार आहे. ११ विविध रंगांचे, ५० लिटर रंग बनविले जाणार आहे. १० किलो रंगांच्या पावडरचाही वापर केला जाणार आहे. संपूर्ण महोत्सवाचे प्रसारण इस्कॉन, औरंगाबाद फेसबुक पेज आणि यू ट्यूब चॅनलवर केला जाणार आहे, असे ‘इस्कॉन’तर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: ISKCON's Gauri-Pournima online celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.