वाळूज ग्रा.पं.सह ६ अंगणवाड्यांना आयएसओ नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:20 PM2019-07-29T23:20:44+5:302019-07-29T23:20:56+5:30
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतसह गावातील सहा अंगणवाड्यांना आज सोमवारी आयोजित कार्यक्रमात ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देण्यात आले. दिल्लीच्या संस्थेकडून ग्रामपंचायत ...
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतसह गावातील सहा अंगणवाड्यांना आज सोमवारी आयोजित कार्यक्रमात ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देण्यात आले. दिल्लीच्या संस्थेकडून ग्रामपंचायत व अंगणवाड्यांना आयएसओ नामांकन देण्यात आले आहे.
वाळूज ग्रामपंचायतीच्या वतीने आयएसओ नामांकन मिळावे, यासाठी गावात शासनाच्या मदतीने विविध उपक्रम राबविले होते. आयएसओ मानांकन मिळावे, यासाठी दिल्लीच्या संस्थेकडे आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली होती.
सोमवारी वाळूजला आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायतसह गावातील ६ अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी सरपंच पपीनकुमार माने,गटविकास अधिकारी बी.बी.थोरात, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे, माजी सरपंच सईदाबी पठाण, ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सर्जेराव भोंड, लोकविकास बँकेचे संचालक अविनाश गायकवाड, नंदु सोनवणे आदींची उपस्थिती होती. आयएसओ प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्याने उपसरपंचासह १३ सदस्यांनी पाठ फिरवली. दांडी मारली होती.