नगर पालिकेच्या शाळेला ‘आयएसओ’
By Admin | Published: August 26, 2015 12:40 AM2015-08-26T00:40:58+5:302015-08-26T00:47:41+5:30
तुळजापूर : तुळजापूर (खुर्द) मधील नगर परिषद शाळा क्र. ३ ला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. २४ आॅगस्ट रोजी शाळेचे मुख्याध्यापक अशोक शेंडगे यांनी हे मानांकन स्वीकारले.
तुळजापूर : तुळजापूर (खुर्द) मधील नगर परिषद शाळा क्र. ३ ला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. २४ आॅगस्ट रोजी शाळेचे मुख्याध्यापक अशोक शेंडगे यांनी हे मानांकन स्वीकारले.
नगर परिषद शाळेने (क्र.३) सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम २००८-२००९ मध्ये औरंगाबाद विभागात उत्कृष्ट शाळा म्हणून बहुमान पटकाविला आहे. या शाळेची विद्यार्थी संख्या वाढण्यामागे मुख्याध्यापक, शिक्षकांसोबतच स्थानिक नगरसेवक पंडित जगदाळे यांचाही मोठा वाटा आहे. सदरील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लोकवाट्यातून सीसीटीव्ही कॅमेरा, बायोमेट्रीक मशीन, टी.व्ही. संच, पिण्याच्या पाण्याचा हौद, स्पिकर संच, ई-लर्निंग साहित्य, संगणक संच, प्रयोगशाळा साहित्य आदी बाबी देण्यात आल्या आहेत.
शाळेच्या या प्रगतीची दखल घेत ‘आयएसओ’ मानांकन प्रदान करण्यात आले आहे. ‘आयएसओ’ समन्वयक अतुल वाघमारे यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक अशोक शेंडगे सदरील मानांकन देवून गौरविण्यात आले. यावेळी नगर परिषद अध्यक्षा जयश्री कंदले, उपनगराध्यक्ष अजित कदम, पंडित जगदाळे, शिक्षण सभापती दयानंद हिबारे, डॉ. स्मिता लोंढे, गणेश कदम, औदुंबर कदम, किशोर साठे, दिलीप गंगणे, बाळासाहेब शिंदे आदींची उपस्थिती होती. शाळेची प्रगती साधण्यासाठी शिक्षक जालिंदर राऊत, सहशिक्षिका निर्मला कुलकर्णी, निता गायकवाड, निलावती देशपांडे, यास्मीन सय्यद, सेविका साळुंके, चव्हाण, कांबळे, संजित देडे, व्हटकर आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)