शेतकऱ्यांचा संप, चिंतेचा विषय

By Admin | Published: June 3, 2017 12:45 AM2017-06-03T00:45:32+5:302017-06-03T00:47:46+5:30

औरंगाबाद :अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आज येथे आवाहन केले.

The issue of farmers' exposure, concern | शेतकऱ्यांचा संप, चिंतेचा विषय

शेतकऱ्यांचा संप, चिंतेचा विषय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘आई संपावर जाणे आणि शेतकरी संपावर जाणे सारखेच आणि एक जरी शेतकरी संपावर गेला तर तो चिंतेचा विषय ठरतो’ अशी बोलकी प्रतिक्रिया देत अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आज येथे आवाहन केले. मात्र, कर्जमाफी व हमीभाव या शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्यांना त्यांनी बगल देण्याचाच प्रयत्न केला. सरकार संवेदनशील असून शेतकऱ्यांसाठी गेल्या अडीच वर्षांत अनेक निर्णय घेतले गेले असल्याचे त्यांचे म्हणणे पडले. हे निर्णयही त्यांनी मोजून दाखवले.
मराठवाड्यातील वृक्षारोपण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज दुपारी ते औरंगाबादेत आले होते. आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शेतकरी संपाचा विषय निघाल्याशिवाय राहिला नाही.
त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार संवेदनशीलतेने पाहत आहे. याबाबतीत (पान २ वर)

Web Title: The issue of farmers' exposure, concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.