औरंगाबादेतील कचऱ्याचा प्रश्न पेटला; चालकाला धमकावत जमावाने कचऱ्याची गाडी पेटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 05:16 PM2018-03-01T17:16:51+5:302018-03-01T19:49:19+5:30
महापालिकेच्या सूचनेनुसार जांभळा येते कचरा टाकण्यासाठी जाताना चालकाला रस्त्यात अडवून जमावाने कचऱ्याची गाडी पेटवून दिली.
औरंगाबाद : महापालिकेच्या सूचनेनुसार जांभळा येते कचरा टाकण्यासाठी जाताना चालकाला रस्त्यात अडवून जमावाने कचऱ्याची गाडी पेटवून दिली. हि घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास मिटमीटा येथे घडली.
औरंगाबादेत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न चिघळल्यानंतर शहरातील कचरा जांभळा येथे टाकण्याची सूचना महापालिकेकडून कचरा वाहकाना करण्यात आली होती. त्यानुसार कचऱ्याची गाडी घेऊन चालक मिलिंद घाटे जांभळा येते जात होते. हि बाब समजताच सुमारे 50 ते 80 जण दुचाकीवरून आले. मीटमिटा येते एका हॉटेल जवळ रस्त्याच्या मधोमध दुचाकी लावून जमावाने चालकाची गाडी अडवली. त्यानंतर चालकाला जांभळा येथे कचरा टाकण्यास विरोध केला व गाडीचे नुकसान करून कचरा पेटवून दिला. त्यानंतर जमाव दुचाकीवरून पसार झाला.
घटनेनंतर प्रसंगावधान राखून चालक मिलिंद घाटे व काही नागरिकांनी जवळच्या हॉटेलमधून पाण्याचा पाईप घेऊन कचऱ्याला लागलेली आग विझवली. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस व महापालिका प्रशासनाचे अधिकारि तेथे पोचले. या घटनेनंतर कचऱ्याची गाडी छावणी पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहे.