आधार कार्ड बोगस बनविणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:10 AM2018-03-24T00:10:53+5:302018-03-24T14:17:50+5:30
आधार कार्ड बोगस करणे शक्य नसल्याचा दावा जिल्हाधिकारी एन. के. राम यांनी लोकमतशी बोलताना केला. बनावट रेशन कॉर्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड बनवून देणाºया मल्टी सर्व्हिस केंद्रावर गुरुवारी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल पाहिल्यानंतरच काय तथ्य आहे हे समोर येईल, असेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद : आधार कार्ड बोगस करणे शक्य नसल्याचा दावा जिल्हाधिकारी एन. के. राम यांनी लोकमतशी बोलताना केला. बनावट रेशन कॉर्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड बनवून देणाºया मल्टी सर्व्हिस केंद्रावर गुरुवारी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल पाहिल्यानंतरच काय तथ्य आहे हे समोर येईल, असेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी एन. के. राम म्हणाले, आधार कार्ड बोगस होणे अशक्य आहे. पोलिसांनी जी कारवाई केली आहे, त्या कारवाईच्या अनुषंगाने माहिती तर घ्यावीच लागेल. पण आधार कार्डमध्ये बनावटगिरी होणे सध्या तरी शक्य नाही. रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड हे एक्स्ट्रा देता येत नाही, तसेच रेशन कार्ड नव्याने देण्याचे काम सध्या तरी बंद आहे. ज्यांना माहिती नाही, अशा नागरिकांची फसगत करण्यासाठी सदरील कार्डचा गोरखधंदा सुरू करण्यात आला असेल. रेशन कार्डच्या बाबतीत बीपीएल, शेतकरी यांच्याबाबत शासनाने अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. बोगस कार्डवरून अन्नधान्य वितरण झाल्याची शक्यता आहे काय, यावर जिल्हाधिकारी म्हणाले, तसे झाले नसेल. परंतु तरीही संबंधित विभागाला सूचना देण्यात येतील. आधार कार्ड तयार करताना डोळ्यांचे पटल, हातांचे ठसे घेतले जातात. त्यामुळे एकाच व्यक्तीचे दोनदा कार्ड होणे कसे शक्य होईल. तरीही पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने आढावा घेऊ. त्यानंतर खोलात जाऊन याप्रकरणी चौकशीदेखील केली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.