मलेरिया नव्हे, आता ‘डेंग्यू’च पडतोय ‘भारी’, उन्हाळ्यातही रुग्णांचे वाढते प्रमाण

By संतोष हिरेमठ | Published: April 25, 2024 04:59 PM2024-04-25T16:59:47+5:302024-04-25T16:59:56+5:30

जागतिक हिवताप दिन : ३ महिन्यांत मलेरियाचा एकही नाही, डेंग्यूचे २७ रुग्ण

It is not malaria, now dengue is falling 'heavily', the number of patients is increasing even in summer | मलेरिया नव्हे, आता ‘डेंग्यू’च पडतोय ‘भारी’, उन्हाळ्यातही रुग्णांचे वाढते प्रमाण

मलेरिया नव्हे, आता ‘डेंग्यू’च पडतोय ‘भारी’, उन्हाळ्यातही रुग्णांचे वाढते प्रमाण

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी २५ एप्रिल रोजी ‘जागतिक हिवताप दिन’ पाळला जातो. हिवताप म्हणजे मलेरिया म्हटले की, कधी काळी धडकीच भरायची. मात्र, गेल्या काही वर्षांत मलेरिया नियंत्रणात आला आहे. मात्र, डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे. 

अगदी उन्हाळ्यातही डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन महिन्यांत मलेरियाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, डेंग्यूचे तब्बल २७ रुग्ण आढळले. उन्हाळ्यात कूलरचा वापर वाढतो. या कूलरच्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते आणि डेंग्यूची लागण होते. त्यामुळे दर आठ दिवसांनी कूलर कोरडे करून पाणी बदललेले बरे.

ही काळजी घ्या..
- डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घरातील पाण्याची भांडी चार ते पाच दिवसांनी स्वच्छ धुवावे आणि कोरड्या फडक्याने पुसूनच भरावे.
- ताप आल्यावर आणि त्यानंतर पूर्ण आराम करावा.
- लहान मुलांना ताप असताना खेळू देऊ नये. आराम करायला सांगावे.
- ताप आल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घेतल्या पाहिजेत.

जिल्ह्यातील स्थिती...
मलेरियाची रुग्ण संख्या
२०२३- ३
२०२४-०

डेंग्यूची रुग्णसंख्या
२०२३-४१५
२०२४-२७

वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा
जिल्ह्यात मलेरिया आता नियंत्रणात आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळतात. नागरिकांनी ताप अंगावर काढता कामा नये. वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. तापाच्या रुग्णांची मलेरियाची तपासणी करण्यावर भर दिला जात आहे.
- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी

Web Title: It is not malaria, now dengue is falling 'heavily', the number of patients is increasing even in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.