कर्जमाफीसाठी सोमवारपर्यंत आधारकार्ड दाखल करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:48 AM2017-09-29T00:48:24+5:302017-09-29T00:48:24+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकºयांनी आधार क्रमांक दिले नाहीत, त्यांनी २ आॅक्टोबरपर्यंत बँकेत आधार क्रमांक जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

It is mandatory to file an Aadhaar form for a debt waiver till Monday | कर्जमाफीसाठी सोमवारपर्यंत आधारकार्ड दाखल करणे बंधनकारक

कर्जमाफीसाठी सोमवारपर्यंत आधारकार्ड दाखल करणे बंधनकारक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकºयांनी आधार क्रमांक दिले नाहीत, त्यांनी २ आॅक्टोबरपर्यंत बँकेत आधार क्रमांक जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु झाली आहे. शेतकºयांनी महा-ई सेवा केंद्रामार्फत आपले अर्ज दाखल केले आहेत. आता या अर्जांवर बँकामार्फत पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी आपले आधारकार्ड बँकेत सादर केले नाहीत, त्या शेतकºयांनी १ व २ आॅक्टोबर रोजी ज्या बँकेतून कर्ज घेतले आहे, त्या बँक शाखेमध्ये आधारकार्ड जमा करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड बँकेत सादर न केल्यास संबंधित शेतकºयाच्या कर्जमाफीचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. १ व २ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक व इतर बँकांच्या शाखा सुरु राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पी.शिव शंकर, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी राम खरटमल यांनी दिली आहे.

Web Title: It is mandatory to file an Aadhaar form for a debt waiver till Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.