परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचता येईला का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:02 AM2021-09-25T04:02:07+5:302021-09-25T04:02:07+5:30
रेल्वे वेळेत पोहोचली पाहिजे औषध निर्माण अधिकारी पदासाठी आयोजित परीक्षेकरिता परभणी शहरातील केंद्र मिळाले आहे. परीक्षेच्या एक तास अगोदर ...
रेल्वे वेळेत पोहोचली पाहिजे
औषध निर्माण अधिकारी पदासाठी आयोजित परीक्षेकरिता परभणी शहरातील केंद्र मिळाले आहे. परीक्षेच्या एक तास अगोदर सकाळी नऊ वाजता केंद्रावर पोहोचायचे आहे. औरंगाबादहून परभणीला जाण्यासाठी सकाळी एकच रेल्वे आहे; यामुळे तेथे वेळेवर पोहोचता येईल का, याची चिंता लागली आहे.
- मयूर पाचुंदे, परीक्षार्थी.
-----------------------------------------------
अखेर प्रवेशपत्र झाले डाऊनलोड
कनिष्ठ लिपिक पदासाठी शनिवारी सकाळी १० ते १२ या वेळेत शहरातील केंद्रावर, तर टेलिफोन ऑपरेटर पदासाठी रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत माझी परीक्षा गंगापूर येथील केंद्रावर होणार आहे. या दोन्ही पदांसाठी तीन दिवसांपासून प्रवेशपत्र डाऊनलोड होत नव्हते. परीक्षेला काही तास उरले असताना शुक्रवारी माझे प्रवेशपत्र डाऊनलोड झाले.
- नितीन मोहिते, परीक्षार्थी.
------------------------------------
(स्टार वृत्त क्रमांक १२२२)