पाऊस सुरू झाला; रस्त्यावरचा समोसा, वडापाव तब्येत बिघडवणार, काय काळजी घ्यावी?
By साहेबराव हिवराळे | Published: June 20, 2024 07:46 PM2024-06-20T19:46:25+5:302024-06-20T19:47:11+5:30
पावसाळ्यात बाजार, तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास तेथील खाद्य पदार्थांचे सेवन हे आरोग्यास घातक आहे.
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्यावरील समोसा, वडापाव खाणे महागात पडू शकते. उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नका व आजार ओढवून घेऊ नका. शाळकरी मुलांनादेखील डब्यात देण्यात येणाऱ्या भाज्या, पदार्थ पालकांनी लक्षपूर्वक पाहणे गरजेचे आहे. उघड्यावरील समोसा, वडापाव तब्येत बिघडवू शकतात.
पावसाळ्यात या आजारांचे धोके
सर्दी : पावसात भिजणे टाळावे, औषधोपचार करावा.
खोकला : पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे, थंड पाणी टाळावे.
डिसेंट्री : आरोग्य बिघडविणारे पदार्थ टाळा.
डायरिया : अस्वच्छ ठिकाणचे खाद्य पदार्थ नको.
उघड्यावरील अन्न पदार्थांचे धोके
पावसाळ्यात बाजार, तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छता असल्यास तेथील खाद्य पदार्थांचे सेवन हे आरोग्यास घातक आहे. अन्न बाधल्यास ती परिस्थिती अत्यंत घातक असू शकते. वैद्यकीय सल्ला घ्यावा.
बाहेरचे खाणे टाळा
पावसाळ्यात बहुतांश जण बाहेर फिरणे पसंत करतात, परंतु पावसात भिजल्यावर उघड्यावरील खाद्य पदार्थ खाऊ नका नाही, तर तुम्हाला आजाराला सामोरे जावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
...तर हॉटेलचालकांवर कारवाई
अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने खाद्य पदार्थांच्या हॉटेलला दिलेल्या सूचना पाळणे गरजेचे आहे. अन्नातून विषबाधा होऊ नये, हे पाहावे. जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.
काय काळजी घ्यावी..
आरोग्य राखण्यासाठी उघड्यावर आणि असुरक्षित ठिकाणचे खाद्य पदार्थ खाल्ल्यास पावसाळ्यात सर्दी, खोकला, डिसेंट्री, डायरिया असे आजार होतात. आपले आरोग्य आपल्याच हाती असते. त्यावर लक्ष द्यावे.
- डॉ. एस. पी. मोहिते, निमा संघटना
खाद्य पदार्थांत गुणवत्ता न आढळल्यास कारवाई
स्वच्छता नसणाऱ्या ठिकाणचे पदार्थ टाळावेत. आपल्या मुलांच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या खाद्य पदार्थांपासून दूर राहिलेलेच बरे, खाद्य पदार्थांत गुणवत्ता न राखणाऱ्या हॉटेल व संस्थांवर कारवाई केली जाते. पावसाळ्यात नियमाचे पालन करावे, नागरिकांनी अशा ठिकाणचे अन्न टाळावे.
- निखील कुलकर्णी, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन.