रेड्यामुखी वेद वदविल्याच्या घटनेला ७३२ वर्षे झाली पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:46 AM2019-02-11T00:46:47+5:302019-02-11T00:47:04+5:30
संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून ज्या नागघाटावर वेद वदवून घेतले, त्या ऐतिहासिक नाग घाटाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे व पैठण -आपेगाव विकास प्राधिकरणातून नागघाटाचा विकास करण्यात यावा, असा ठराव रविवारी झालेल्या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून ज्या नागघाटावर वेद वदवून घेतले, त्या ऐतिहासिक नाग घाटाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे व पैठण -आपेगाव विकास प्राधिकरणातून नागघाटाचा विकास करण्यात यावा, असा ठराव रविवारी झालेल्या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून नाग घाटाला स्मारकाचा दर्जा द्यावा म्हणून जनतेतून मागणी होत आहे. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नाग घाटावर ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवून धर्म न्याय पिठाकडून शुद्धीपत्र मिळविले होते. या घटनेला माघ शुद्ध वसंत पंचमीला ७३२ वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने नागघाटावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बंडेराव जोशी, दिनेश पारीख, प्रमोद दौड, परमेश्वर मुंडे, रमेश पाठक, राजेंद्र आंबेकर यांचे प्रवचन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदार मिरदे, हरीपंडित नवथर, ईश्वर म्हस्के, गोकुळ वरकड, अनिल सराफ, पंडित बोंबले, योगेश साबळे, सुरेंद्र जव्हेरी, पियुष सराफ, अश्विन गोजरे, जगन्नाथ जमादार, धनराज चितलांगी, लालू सराफ, शरद रावस, मिलिंद नाईक, पुनित सराफ, बाबू बर्फे, संतोष छडीदार, दक्षेस सराफ, भीमसिंग बुंदीले, तुकाराम बडसल, सतीश सराफ, संजय पल्लोड, प्रसाद ख्रिस्ती, मुकेश जव्हेरी, भाऊसाहेब पठाडे, भालचंद्र बेंद्रे, राजू रूपेकर आदींनी परिश्रम घेतले. रेड्याच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून महाआरतीने या उत्सवाची सांगता झाली.
वसंत पंचमी पर्वावर महामंडलेश्वर दहीवाळ महाराज यांच्या शेकडो भक्तांनी, शिष्यांनी, सेवेकऱ्यांनी प्रयाग तिर्थावर शाही स्नान केले, तर सतीश वागेश्वरी परिवार तथा मित्रमंडळीच्या वतीने १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दुपारी २ ते ६ या वेळेत भागवत गल्लीत विद्याभूषण प. पू. मुकूंदकाका जाटदेवळेकर यांची भागवतकथा आयोजित केली आहे.