उदघाटन झाले,पण कुलूप निघेना

By Admin | Published: June 28, 2014 11:46 PM2014-06-28T23:46:20+5:302014-06-29T00:37:40+5:30

शिरूर अनंतपाळ : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या येथील मुख्य रस्त्यावरील पोलिस चौकीचे गेल्या सहा महिन्यापासून कुलूपच निघाले नसल्याने ही चौकी केवळ नाममात्रच ठरत आहे़

It was inaugurated, but it was locked | उदघाटन झाले,पण कुलूप निघेना

उदघाटन झाले,पण कुलूप निघेना

googlenewsNext

शिरूर अनंतपाळ : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या येथील मुख्य रस्त्यावरील पोलिस चौकीचे गेल्या सहा महिन्यापासून कुलूपच निघाले नसल्याने ही चौकी केवळ नाममात्रच ठरत आहे़
शिरूर अनंतपाळच्या मुख्य रस्त्यास राज्य मार्गाचा दर्जा मिळाल्याने आणि अतिक्रमण हटावची मोहिम धडकपणे राबविण्यात आल्याने येथील उदगीर रस्त्यावर मोठा चौक सहा महिण्यांपूर्वी निर्माण झाला़ या मोकळया चौकाला नाव देण्यासाठी अनेक सामाजिक संघटनाही सरसावल्या़ परंतु, गावातील ज्येष्ठ नागरिकांनी चौकाऐवजी पोलिस चौकी निर्माण केल्यास अधिक फायदेशीर ठरेल, अशी कल्पना सुचविली़
पोलिस चौकीमुळे वाहतुकीचे नियंत्रण होईल़ रहदारी सुरळीत होईल, त्याचबरोबर गावात नेहमी शांतता रहावी म्हणून पोलिसांना बसण्यास निश्चित ठिकाण होईल, अशी या कल्पनेमागील भावना होती़
त्यानुसार लोकसहभागातून हजारो रूपये निधी गोळा करून पोलिस चौकी सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आली़ विशेष म्हणजे चौकीत बसण्यासाठी टेबल, खुर्चीची व्यवस्थाही करण्यात आली़ या पोलिस चौकीचे रितसर पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकीदार नियुक्त करण्यात येईल, अशी घोषणाही केली़ उद्घाटनानंतर मात्र ही घोषणा हवेतच विरली़ सहा महिन्यांपासून पोलिस ठाण्याकडून चौकीदार नियुक्त करण्यात आला नसल्याने पोलिस चौकी कुलूपबंद आहे़ (वार्ताहर)
चौकीदार देण्यात येईल़़़
शिरूर अनंतपाळ येथे उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीसाठी एका पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक बंडोपंत मुंडे यांनी सांगितले़
या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांनी चोख भूमिका बजावली होती़ परंतु, आता ही चौकीच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे़ पोलिसही उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहत आहेत़ चौकीदार नसल्याने गावात पुन्हा रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सध्या मुख्य रस्त्याचे काम सुरु असल्याने एकीरी वाहतूक सुरु आहे़ त्यामुळे पोलिस चौकी सुरु करावी, अशी मागणी होत आहे़

Web Title: It was inaugurated, but it was locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.