इटकळ, सावरगावसह, मंगरूळ मंडळात अतिवृष्टी

By Admin | Published: July 22, 2016 12:27 AM2016-07-22T00:27:05+5:302016-07-22T00:37:44+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात बुधवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ चालू वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा या चार तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली़

Itkal, Sawargaon, Manglul Mandal, Overdream | इटकळ, सावरगावसह, मंगरूळ मंडळात अतिवृष्टी

इटकळ, सावरगावसह, मंगरूळ मंडळात अतिवृष्टी

googlenewsNext


उस्मानाबाद : जिल्ह्यात बुधवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ चालू वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा या चार तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ यात तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे १४५ मिमी, सावरगाव मंडळात ९५ मिमी तर मंगरूळ मंडळात ८० मिमी पाऊस झाला़ शिवाय पाच मंडळात ५० मिलीमिटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
चालू वर्षात जिल्ह्यात पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली असून, या पावसामुळे मागील-चार पाच वर्षात प्रथमच बहुतांश भागातील वेळेवर पेरण्या झाल्या आहेत़ तर काही भागात अपुरा पाऊस झाल्याने उशिराने पेरण्या झाल्या आहेत़ मागील काही दिवसांपासून अपुरा पाऊस झाल्याने खरीप पिकांसाठी पावसाची गरज व्यक्त होत होती़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बुधवारी बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली़ सर्वाधिक पाऊस तुळजापूर तालुक्यात झाला़ तुळजापूर तालुक्यातील इटकळ मंडळात तब्बल १४५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे़ त्या पाठोपाठ सावरगाव मंडळात ९५ मिमी व मंगरूळ मंडळात ८० मिमी पाऊस झाला आहे़ तुळजापूर मंडळात ६२ मिमी, जळकोट मंडळात ४७ मिमी, नळदुर्ग मंडळात ६४ मिमी, सलगरा मंडळात ५८ मिमी पाऊस झाला़ उस्मानाबाद शहर मंडळात १५मिमी, उस्मानाबाद ग्रामीण मंडळात ३ मिमी, तेर मंडळात ६ मिमी, बेंबळी मंडळात ३५ मिमी, पाडोळी- १८ मिमी, जागजी १३ मिमी, केशेगाव मंडळात ४६ मिमी पाऊस झाला़ उमरगा तालुक्यातील उमरगा मंडळात २३ मिमी, मुरूम ६० मिमी, नारंगवाडी- ११ मिमी, मुळज ९ मिमी, दाळींब मंडळात ३४ मिमी पाऊस झाला़ लोहारा तालुक्यातील लोहारा मंडळात ५२ मिमी, माकणी- १६ मिमी, जेवळी ३५ मिमी पाऊस झाला़
कळंब तालुक्यातील कळंब व गोविंदपूर मंडळात प्रत्येकी १ मिमी तर शिराढोण मंडळात ४ मिमी पावसाची नोंद झाली़ भूम महसूल मंडळात १३ मिमी, ईट- ३ मिमी, अंबी- १३ मिमी, माणकेश्वर- १५ मिमी, वालवड - १० मिमी पाऊस झाला़ वाशी तालुक्यातील वाशी व तेरखेडा मंडळात प्रत्येकी ४ मिमी तर पारगाव मंडळात ५ मिमी पाऊस झाला़ परंडा तालुक्यातील परंडा महसूल मंडळात १० मिमी, जवळा (बु़) २० मिमी, आनाळा- ९ मिमी, सोनारी ३७ मिमी, आसू मंडळात १६ मिमी पाऊस झाला़ दरम्यान, या पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील जलसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव परिसरात गुरुवारी ९५ मिमी पाऊस झाला़ या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे़ पूल पाण्याखाली गेले होते़ सलग आठ तास पावसाने दमदार हजेरी लावली़ या पावसामुळे धोत्री, खडकी या दोन गावातील ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेले होते़ खडकी गावात मुक्कामी गेलेली बस पुलावरील पाण्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत बाहेर येऊ शकली नाही़ या भागात दमदार पाऊस झाल्याने तामलवाडी, धोत्री, सांगवी, माळुंब्रा, पांगरधरवाडी या साठवण तलावातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे़ पुष्य नक्षत्रातील पहिलाच मोठा पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला असून, साठवण तलाव भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे़

Web Title: Itkal, Sawargaon, Manglul Mandal, Overdream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.