तमन्ना है बस यही... वहीं चलिए.. वहीं चलिए..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:06 AM2017-08-21T01:06:51+5:302017-08-21T01:06:51+5:30
‘लोकमत समाचार’ च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी रात्री (दि. १८) संत तुकाराम नाट्यगृहात ‘जुनून’ या गीत- संगीताच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘तमन्ना है बस यही दिल की.. के वहीं चलिए वहीं चलिए.. वह मैफील में दुनिया लुट गयी अपनी...’ अशा एकापेक्षा एक सरस कव्वाली, गजल, मुजरे, सुफी गीते आणि शेरो-शायरीने औरंगाबादकरांना खिळवून ठेवले. शायरीच्या अनोख्या सादरीकरणाने रसिक श्रोते तृप्त झाले. ‘लोकमत समाचार’ च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी रात्री (दि. १८) संत तुकाराम नाट्यगृहात ‘जुनून’ या गीत- संगीताच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. बाहेर रिमझिम पाऊस आणि सभागृहात रसिक सुफी संगीत, हिंदी चित्रपटातील सदाबहार कव्वालींचा मनमुराद आस्वाद घेत होते.
भरपावसात या कार्यक्रमासाठी रसिक, वाचकांनी गर्दी केली होती. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर बापू घडमोडे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, कुलगुरू बी.ए. चोपडे, प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, आ. अब्दुल सत्तार, आ. सतीश चव्हाण, ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह, नागरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, माजी मंत्री गंगाधर गाडे, माजी आ. डॉ. कल्याण काळे, पं. नाथराव नेरळकर, माजी उपमहापौर राजू शिंदे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उद्योगपती नंदकिशोर कागलीवाल, सीएमआयचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ आदींची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यांच्यासह शहरातील राजकीय, शैक्षणिक, उद्योग व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकाºयांची यावेळी उपस्थिती होती. लोकमततर्फे राजेंद्र दर्डा, आशू दर्डा, करण दर्डा, ओमप्रकाश केला, संदीप विश्नोई, अमिताभ श्रीवास्तव, चक्रधर दळवी, योगेश गोले, प्रेमदास राठोड आणि परिवारातील सर्व सदस्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. दीप प्रज्वलनानंतर ‘शिर्डीवाले साई बाबा...’ या कव्वालीने मैफिलीस प्रारंभ झाला.
यानंतर राधिका अत्रे यांनी ‘निगाहे मिलाने को जी चाहता है..’ हे आल्हाददायक गीत सादर करून वातावरण निर्मिती केली. आशिषकुमार देशमुख यांनी सादर केलेल्या ‘ताकते रेहते तुझको सांज सवेरे..’ या गाण्याला रसिकांची तुफान दाद मिळाली.
शाखंबरी कीर्तीकर यांनी ‘दिल चीज क्या है आप मेरी..’ ही गजल सादर करून रसिकांना तृप्त केले. विवेक पांडे बनारसी यांनी सादर केलेल्या ‘परदा है परदा..’ या कव्वालीने रसिकांना सुरेल ठेका धरण्यास भाग पाडले. ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में..’, ‘यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी..’, ‘सैया.. ’, ‘है अगर दुश्मन दुश्मन...’, ‘पिया रे पिया रे.. थारे बिना लागे नाही म्हारा जिया रे..’ यासारख्या कव्वालींनी रसिकांना सुरांच्या पावसात चिंब भिजविले. ‘कजरा मोहब्बतवाला..’, ‘दमादम मस्त कलंदर..’, ‘झुम बराबर झुम शराबी..’ यासारख्या गीतांनी उत्तरोत्तर अधिकाधिक उमलत जाणाºया या मैफिलीचा समारोप ‘चढता सूरज धीरे धीरे, ढलता ही ढल जाएगा...’ या लोकप्रिय कव्वालीने झाला. ‘जुनून’चे संचालक संदीप पंचवाटकर यांनी चुटकुले, विनोदी किस्से तर काही वेळेला आठवणी सांगून खुमासदार संचालन करून रसिक ांना खिळवून ठेवले.