वर्ष वाया गेलं तरी चालेल, पण शाळा नको

By | Published: November 22, 2020 09:01 AM2020-11-22T09:01:36+5:302020-11-22T09:01:36+5:30

युरोपमध्ये पुन्हा उफाळून आलेली दुसरी लाट, दिल्लीत मोठ्या प्रमाणात झालेली रुग्णवाढ, अहमदाबादला रात्रीच्या वेळी लागू झालेला कर्फ्यू ...

It's okay to waste years, but not school | वर्ष वाया गेलं तरी चालेल, पण शाळा नको

वर्ष वाया गेलं तरी चालेल, पण शाळा नको

googlenewsNext

युरोपमध्ये पुन्हा उफाळून आलेली दुसरी लाट, दिल्लीत मोठ्या प्रमाणात झालेली रुग्णवाढ, अहमदाबादला रात्रीच्या वेळी लागू झालेला कर्फ्यू आणि कोरोनाच्या येऊ पाहणाऱ्या दुसऱ्या लाटेची धास्ती यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चौकट :

- औरंगाबाद जिल्ह्यात इयत्ता ९ वी ते १२ वी या वर्गात सर्वच शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साडेतीन ते चार लाख एवढी आहे.

- तर जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, सरकारी, जिल्हा परिषद शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या १०,४१४ एवढी आहे.

चौकट :

१. हे विषय शाळेत शिकविणार

सध्या तरी इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषय शाळेत शिकविण्याचे नियोजन आहे. मात्र, वेळ, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, पालकांची तयारी या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन इतर विषयही शाळेत शिकविले जाऊ शकतात.

२. ऑनलाईन शिकविले जाणारे विषय

दररोज चार तासांची शाळा होणार असून, यात ३ तासिका घेण्याचा विचार आहे. सर्व भाषा विषय, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विविध कला हे सर्व विषय ऑनलाईन पद्धतीनेच शिकविण्यात येतील. महिनाभरात विद्यार्थी आणि पालकांचा प्रतिसाद पाहून यात बदलही होऊ शकतो.

चौकट :

१. संकट टळलेले नाही

कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे; पण संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळण्यास मन धजावत नाही. त्यामुळे निदान लस येईपर्यंत तरी आम्ही मुलांना शाळेत पाठविण्याचा विचार करणार नाही. मग हे वर्ष वाया गेले तरी चालेल. शाळा, शिक्षण विभाग त्यांच्या परीने सर्व काळजी घेतील, याची खात्री आहे; पण तरीही मुलांना शाळेत पाठविणे धोकादायक वाटते.

- स्मिता साळुंके, पालक

२. २०-२५ टक्के पालक तयार

सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. या अनुषंगाने शिक्षण विभागातर्फे पालकांशी संवाद साधला जात आहे. २० ते २५ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार आहेत. एक महिना वाट पाहू, मग जानेवारीपासून मुलांना शाळेत पाठवू, असेही अनेक पालकांचे म्हणणे आहे. शिक्षण विभाग आणि शाळांनी मात्र मुलांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे.

- डी. बी. चव्हाण

शिक्षणाधिकारी, मा. वि.

Web Title: It's okay to waste years, but not school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.