जे. के. जाधव साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:04 AM2021-08-12T04:04:27+5:302021-08-12T04:04:27+5:30

वैजापूर : जे. के. जाधव साहित्य पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. पुरस्काराचे यंदाचे हे सहावे वर्षे आहे. मराठी ...

J. K. Distribution of Jadhav Sahitya Puraskar in style | जे. के. जाधव साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

जे. के. जाधव साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

googlenewsNext

वैजापूर : जे. के. जाधव साहित्य पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. पुरस्काराचे यंदाचे हे सहावे वर्षे आहे. मराठी साहित्यात दर्जेदार लिखाण करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. चिकलठाणा येथील राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात या पुरस्काराचे वितरण झाले. अध्यक्षस्थानी घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, प्रमुख उपस्थितीत मसापचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, संस्थेचे अध्यक्ष जे. के. जाधव यांची उपस्थिती होती.

प्राप्त झालेल्या साहित्यातून निवड समितीने सहा लेखकांची जे.के. जाधव साहित्य पुरस्कारासाठी निवड केली. डॉ. भीमराव वाघचौरे (वैजापूर), डॉ. प्रभाकर शेळके (जालना), डॉ. संजय गोराडे (नाशिक), डॉ. विशाल इंगोले (लोणार), डॉ. विरभद्र मिरेवाड (नांदेड), डॉ. प्रवीण तांबे (वैजापूर) या निवड झालेल्या लेखकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यशस्वितेसाठी प्राचार्य विष्णू भिंगारदेव, डॉ. एजाज कुरेशी, डॉ. राजाभाऊ टेकाळे, प्रा. वाघ, कोतकर यांनी पुढाकार घेतला.

----

फोटो : जे. के. जाधव साहित्य पुरस्कार वितरणप्रसंगी उपस्थित मान्यवर.

100821\img-20210810-wa0231_1.jpg

जे. के. जाधव साहित्य पुरस्कार वितरणप्रसंगी उपस्थित मान्यवर

Web Title: J. K. Distribution of Jadhav Sahitya Puraskar in style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.