औरंगाबादच्या जाधववाडी भाजीमंडईला लग्नसराईचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:09 PM2018-12-03T12:09:37+5:302018-12-03T12:12:01+5:30
भाजीपाला : औरंगाबाद सध्या फळभाज्यांच्या अडत बाजारात मंदी आहे.
औरंगाबाद सध्या फळभाज्यांच्या अडत बाजारात मंदी आहे. उठाव वाढल्यावरच भाव वधारतील, यामुळे आता शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही लग्नसराईचे वेध लागले आहेत.
लग्नसराईच्या अनुशंगाने शेतकरी फळभाज्या व पालेभाज्यांचे नियोजन करीत आहेत. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात रविवारी वांगे १० रुपये, फुलकोबी ५ रुपये, पत्ताकोबी ५ रुपये, गवार २० रुपये प्रतिकिलो विक्री झाले. मागील आठवडाभरात हेच भाव स्थिर होते.
गुरुवारी ५० ते ६० रुपये प्रति कॅरेट (२० किलो) विक्री झालेले टोमॉटो मात्र रविवारी वधारून १०० रुपये कॅरेट विकले गेले. म्हणजेच ५ रुपये किलो टोमॉटो अडतमध्ये तर किरकोळ विक्रीत १० ते १५ रुपये किलोने ते विक्री होत होते. आग्रा येथील शीतगृहातील जुना बटाट्याची रविवारी ६० टन आवक झाली. ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल बटाटा विकला गेला. कांद्याची दररोज ६० ते ७० टन आवक होत आहे.