जगन् माता शारदा वत्कृत्व स्पर्धेचे १६ ते १९ डिसेंबरदरम्यान आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:30+5:302020-12-17T04:24:30+5:30
स्पर्धेचे वेळापत्रकानुसार १६ डिसेंबर गट क्रमांक एक यात इयत्ता पाचवी ते सातवीसाठी उत्तम स्वप्ने, अग्निहोत्र, मातृ देवोभव् हे विषय ...
स्पर्धेचे वेळापत्रकानुसार १६ डिसेंबर गट क्रमांक एक यात इयत्ता पाचवी ते सातवीसाठी उत्तम स्वप्ने, अग्निहोत्र, मातृ देवोभव् हे विषय आहेत. १७ डिसेंबरला गट क्रं. २ मध्ये आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी कोरोना काळात अग्रिहोत्राचा उपयोग, वेद व आयुर्वेद एक देणगी, सानेगुरुजी विचार व अचार, संत तुकाराम जीवनाचे मार्गदर्शक हे विषय देण्यात आले आहे. १८ डिसेंबरला गट क्रं. ३ व ४ मध्ये पाचवी ते सातवी इंग्रजी माध्यम व आठवी ते दहावी इंग्रजी माध्यम वरिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. तर १९ डिसेंबरला गट क्रं. ५ व ६ यात अकरावी, बारावी, डी.एड. व पॅरामेडिकल कॉलेजला लोकशाहीचा कणा संविधान, भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम, चारित्र्य संपन्न विचाराच्या वाटेवर, खरा तो एकची धर्म, प्रदुषणमुक्त हवा- उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली, कोरोना काळात जगलेली माणुसकी, उत्तम माणुसकीची जननी अहिंसा आदी विषय देण्यात आले असल्याचे जवळकर यांनी कळवले आहे.