कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी जगन्नाथ काळे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 19:01 IST2021-07-22T19:00:30+5:302021-07-22T19:01:51+5:30
Aurangabad Agricultural Produce Market Committee : शासनाच्या वतीने १२ अशासकीय प्रशासक मंडळाची निवड करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी जगन्नाथ काळे यांची निवड
करमाड ( औरंगाबाद ) : औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी माफदाचे अध्यक्ष व व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ वैजीनाथराव काळे यांची निवड करण्यात आली. जगन्नाथ काळे हे माजी आमदार व औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांचे बंधू आहेत.
शासनाच्या वतीने १२ अशासकीय प्रशासक मंडळाची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार काळे हे मुख्य प्रशासक असून सर्जेराव विश्वनाथराव चव्हाण, शिवाजी सूर्यभान ढाकणे, शेख मो.शेख चाँद, शिवाजी रायभान गावंडे, मो.अबू सुफीयाना मो.गयास बागवान, उदयराज खंडेराव पवार, कृष्णा भाऊसाहेब उकर्डे, मुरलीधर पुंडलिक चौधरी, प्रकाश मारोती जाधव, गणेश कडोबा नवले, अशोक अंबादास शिंदे हे प्रशासक मंडळाची सदस्य आहेत. या निवडीवरून डॉ.कल्याण काळे यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.