कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र' लिहून काळे फासले काळे; औरंगाबादेत युवासेना आक्रमक
By संतोष हिरेमठ | Published: December 7, 2022 11:54 AM2022-12-07T11:54:59+5:302022-12-07T11:55:37+5:30
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत असून, त्याचे पडसाद उमटत आहेत.
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात आज पहाटे साडेपाच वाजता ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली. बसवर 'जय महाराष्ट्र' असेही लिहण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत असून, त्याचे पडसाद उमटत आहेत. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कर्नाटक येथील असलेल्या बसला काळे फासण्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान, कर्नाटक येथील विविध भागांतून औरंगाबादेत बस दाखल होतात. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मात्र, आज पहाटे औरंगाबादेत देखील ठाकरे गटाच्या युवासेनेकडून कर्नाटक बसला काळे फासले. तसेच आक्रमक कार्यकर्त्यांनी बसवर जय महाराष्ट्र देखील लिहिले. दरम्यान, या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ प्रशासन सतर्क झाले आहे.