जायकवाडीत एक टक्का पाणी वाढले; धरण अद्यापही मृतसाठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:09 PM2019-07-29T13:09:27+5:302019-07-29T13:12:27+5:30

रात्रीतून धरणाच्या जलसाठ्यात १ टक्का वाढ झाली

Jaikwadi increased water by one percent; The dam is still dead | जायकवाडीत एक टक्का पाणी वाढले; धरण अद्यापही मृतसाठ्यात

जायकवाडीत एक टक्का पाणी वाढले; धरण अद्यापही मृतसाठ्यात

googlenewsNext
ठळक मुद्दे नांदूर-मधमेश्वर कालव्यामधून गोदावरी पात्रात आवक धरणात येणारी आवक कायम राहिली, तर सोमवारपर्यंत धरणात आणखी १ टक्का वाढ

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर-मधमेश्वर कालव्यामधून गोदावरी पात्रात २३,९५९ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत असून, हे पाणी शनिवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. जायकवाडी धरणात १८,४७७ क्युसेक क्षमतेने रविवारी आवक सुरू होती. रात्रीतून धरणाच्या जलसाठ्यात १ टक्का वाढ झाली असून, धरणात १६.५३ दलघमी (अर्धा टीएमसी) नवीन पाण्याची भर पडली आहे. धरण अद्यापही मृतसाठ्यात आहे.  

धरणात येणारी आवक कायम राहिली, तर सोमवारपर्यंत धरणात आणखी १ टक्का वाढ होण्याची अपेक्षा धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, अजमेरा यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्यातील करंजवन १७ मि.मी., वाघाड ३४, ओझरखेड ७, पालखेड ३, गंगापूर ५१, गौतमी ८०, कश्यप ४३, कडवा ३७, दारणा ३४, भावली १२०, नांदूर मधमेश्वर २० मि.मी., अशी पावसाची नोंद झाली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील दारणा धरणातून १३,०५८ क्युसेक, कडवा धरणातून ३,७०८ असा विसर्ग शनिवारी दुपारपासून सुरू करण्यात आला. या दोन्ही धरणांचा विसर्ग नांदूर मधमेश्वर कालव्यात पोहोचताच नांदूर मधमेश्वर वेअरमधून २३,९५९ क्युसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. नांदूर मधमेश्वर ते पैठणदरम्यान गोदावरी भरलेली असल्याने अवघ्या १५ तासांत हे पाणी जायकवाडी धरणात येऊन पोहोचले.रविवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १,४८९.२० फूट होती, धरणात ४५३.९०८ दलघमी एकूण जलसाठा असून धरणात -९.३७ टक्के जलसाठा आहे.

मृतसाठ्यातून २१० दलघमीचा वापर
जायकवाडी धरणाचा जलसाठा २२ मार्च रोजी मृतसाठ्यात गेला. तेव्हापासून जायकवाडीतून पिण्यासाठी व औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. २२ मार्च ते २८ जुलैदरम्यान धरणाच्या मृतसाठ्यातून २१० दलघमी (७.४१ टीएमसी) पाण्याचा उपसा झाला आहे. मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी अद्यापही २२६.५४६ दलघमी (८ टीएमसी) पाण्याची गरज आहे.

जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील नाशिक जिल्ह्यातील धरणाचा जलसाठा-
करंजवण     १६.२२%,

वाघाड         ३१.९१%
ओझरखेड     ३.५२%.
पालखेड         ५२.८७%
गंगापूर         ७४.३५%. 
गौतमी         ५८.०३%.
कश्यपी         ४८.२७%
कडवा         ८९.४०%. 
दारणा         ८६.७६%.
भावली         १००%.
मुकणे         ३४.३७%.
नांदूर मधमेश्वर ९६.४९%. 

अहमदनगर जिल्ह्यातील धरणातील जलसाठा-
भंडारदरा         ५८.६१%.
निळवंडे         २५.०८%.
मुळा         २३.५७%.
पुणेगाव         ०.२४%.
तीसगाव         ०००%.
वालदेवी         ८२.४३%.

Web Title: Jaikwadi increased water by one percent; The dam is still dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.