Video : तहानलेल्या जायकवाडीच्या पाण्याची पुन्हा नासाडी सुरू; पाईपलाईन फुटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 09:08 PM2019-08-08T21:08:33+5:302019-08-08T21:27:50+5:30

औरंगाबाद-पैठण रोडवरील महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.

Jaikwadi water begin waste again; pipeline burst in aurangabad | Video : तहानलेल्या जायकवाडीच्या पाण्याची पुन्हा नासाडी सुरू; पाईपलाईन फुटली

Video : तहानलेल्या जायकवाडीच्या पाण्याची पुन्हा नासाडी सुरू; पाईपलाईन फुटली

googlenewsNext

जायकवाडी (औरंगाबाद) : गेल्या महिन्यात मृत्यू साठ्यात असलेल्या जायकवाडी धरणाला नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पाऊसामुळे संजीवनी मिळाली आहे. मात्र, औरंगाबाद महानगरपालिका बेजबाबदार कारभारामुळे आलेल्या पाण्याची पुन्हा नासाडी सुरू झाली आहे. औरंगाबाद-पैठण रोडवरील महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.


पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील ईसारवाडीजवळ नाथ सिड कंपनीसमोर आज संध्याकाळी 6 वा दरम्यान औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले.


जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा केला जातो. ईसारवाडी येथे नेमकी कोणत्या कारणाने ही पाईपलाईन फुटली हे समजू शकले नसले तरी पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी रस्त्यावर वाया गेले. विशेष म्हणजे दोन तासाहून अधिक वेळ होउनही महानगरपालिकेचा एकही अधिकारी याकडे फिरकला नसल्याचे पहायला मिळाले. दुष्काळाने होरपळलेल्या पालिकेला आता जायकवाडी धरणात मुबलक पाणी आल्याने आता पाणी वाया जात असताना लक्ष नसल्याची गंभीर बाब समोर आली. फुटलेल्या पाईपलाईनमुळे पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा येत आहे.

Web Title: Jaikwadi water begin waste again; pipeline burst in aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.