जिल्हा बँकेच्या ६८ शाखांमध्ये रविवारीही स्वीकारला पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:31 AM2017-07-31T00:31:09+5:302017-07-31T00:31:09+5:30
नांदेड: सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे पीक विमा भरण्यास शेतकºयांना अनंत अडचणी येत आहेत. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आॅफलाईन व मॅन्युअली पीक विमा स्वीकारला जात आहे. जिल्हा बँकेच्या ६८ शाखांमध्ये रविवारची सुटी असतानाही पीक विमा स्वीकारला जात असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे पीक विमा भरण्यास शेतकºयांना अनंत अडचणी येत आहेत. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आॅफलाईन व मॅन्युअली पीक विमा स्वीकारला जात आहे. जिल्हा बँकेच्या ६८ शाखांमध्ये रविवारची सुटी असतानाही पीक विमा स्वीकारला जात असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.
रविवारी जिल्हा बँकेत झालेल्या पत्रपरिषदेत आ. चिखलीकर यांनी आॅनलाईन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे. त्याचवेळी सॉप्टवेअरमधील तांत्रिक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. या अडचणीबाबत आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मॅन्युअली पीक विमा स्वीकारण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी संपर्क साधून त्याबाबतची परवानगी घेतली. पीक विमा भरण्याची मुदत आणखी १५ दिवस वाढविण्याची मागणीही त्यांनी केली.
जिल्हा बँकेतही पीक विमा स्वीकारला जात आहे. रविवार असला तरीही पीक विम्यासाठी शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्हा बँकेच्या ६८ शाखांमध्ये पीक विमा स्वीकारला जात आहे. बँकेचे जवळपास ३०० कर्मचारी या कामी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याचे काम झाले असून आॅगस्टमध्ये या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पीक विमा भरण्यासाठी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशी परिस्थिती असताना आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे ते म्हणाले. रविवारी जिल्हा बँकेत कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हार, तुºयावर खर्च न करता कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भाजपा प्रवेशाबाबत आ. चिखलीकर यांनी नेहमीप्रमाणे संदिग्ध उत्तरे दिली.
यावेळी जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, माजी जि.प. सदस्य गणेश पाटील सावळे यांची उपस्थिती होती.