उमरीत जलजागृती सप्ताह मेळावा
By Admin | Published: March 20, 2016 11:41 PM2016-03-20T23:41:54+5:302016-03-20T23:46:55+5:30
उमरी : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्ऱ६ नांदेड यांच्या वतीने लाभधारक शेतकऱ्यांचा जलजागृती सप्ताह सोहळा पार पडला़
उमरी : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्ऱ६ नांदेड यांच्या वतीने लाभधारक शेतकऱ्यांचा जलजागृती सप्ताह सोहळा पार पडला़
कार्यकारी अभियंता एम़ व्ही़ मठपती अध्यक्षस्थानी होते़ तर ऩ प़ च्या मुख्याधिकारी निता अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती़ उमरी तालुक्यातील लाभधारक व गोदावरी पाणीवापर संस्था कारेगाव व जयकिसान पाणीवापर संस्था बोळसा बु़ येथील बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला़ सर्व संचालकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले़ जनजागृती सप्ताहनिमित्त पाण्याचे महत्त्व व पाण्याचा योग्य वापर याबाबत वक्त्यांनी मार्गदर्शन केले़
पाणीवापर संस्थेचे कार्य व कर्तव्य जबाबदारी याविषयी उपअभियंता मधुसूदन डोड्या यांनी माहिती दिली़ उपअभियंता गोसावी, कृषी अधिकारी गोरे यांनी पाणी व कृषी संदर्भात मार्गदर्शन केले़
जल प्रतिज्ञेचे वाचन शाखा अभियंता पेशकार यांनी केले़ नुकतेच निवृत्त झालेले शाखा अभियंता ए़पी़ अंबेकर यांचा सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमास निमटेक, सालेगाव, आटाळा, बोळसा बु़, कावलगुडा खु़, यल्लापूर येथील सरपंच, उपसरपंच, ग्रा़ पं़ सदस्य, शेतकरी व नागरिक उपस्थित होते़ बी़ व्ही़ घोलप यांनी सूत्रसंचालन तर एल़ व्ही़ पाठक यांनी आभार मानले़ (वार्ताहर)