जालना पालिकेला मिळणार अटल अमृत योजना

By Admin | Published: August 20, 2015 12:29 AM2015-08-20T00:29:09+5:302015-08-20T00:29:09+5:30

जालना : जालना पालिकेला सर्वाधिक लाभदायक ठरलेल्या नगरोत्थान योजना रद्द करून त्या ऐवजी अटल अमृत ही योजना देण्याचा निर्णय अंदाज समितीचे प्रमुख

Jalalalika will get the Atal Amrut Yojna | जालना पालिकेला मिळणार अटल अमृत योजना

जालना पालिकेला मिळणार अटल अमृत योजना

googlenewsNext


जालना : जालना पालिकेला सर्वाधिक लाभदायक ठरलेल्या नगरोत्थान योजना रद्द करून त्या ऐवजी अटल अमृत ही योजना देण्याचा निर्णय अंदाज समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांनी घेतला आहे. त्याबाबत तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या आहेत.
बुधवारी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह येथून समितीच्या दौऱ्यास सुरूवात झाली. आ. अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील या पथकात आ. डॉ. मिलिंद माने, आ. चरण वाघमारे, आ. शशीकांत खेडकर, आ. अमरसिंह पंडित यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी या पथकाचे स्वागत केले.
सर्वप्रथम औद्योगिक वसाहती मधील नागेवाडी जवळील टप्पा तीन मध्ये उभारण्यात आलेल्या एलजीबी या कंपनीत भेट देवून पाहणी केली. तेथील कामगारांचे प्रश्न समजावून घेतले. तसेच या कंपनीत किती कामगार आहे. त्यात जालन्यातील स्थानिक कामगारांची संख्या किती?, जमीनी दिलेल्या किती शेतकऱ्यांच्या पाल्यांना नौकरीस ठेवले. आदी बाबतची माहिती घेण्याचे आदेश संबधीत कामगार अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच सर्व अहवाल गुरूवारी होणाऱ्या बेठकीत सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानंतर हे पथक औद्योगीक वसाहत टप्पा २ मधील पोलाद व भाग्यलक्ष्मी स्टील कंपनीस भेट देवून पाहणी केली. तसेच पोलाद कंपनीतील एका कॅबीनमध्ये पथकाने सुमारे अर्धातास उद्योजक व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
त्यानंतर हे पथक पोलिस वससाहतीत गेले. तेथे १५० कॉर्टरमधील रूम न १४४ व १४५ ची पाहणी केली. यावेळी वसाहतीमधील पोलिस कुटुंबियानी आपल्या व्यथा मांडल्या. या ठिकाणी कुठलीही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. निवास स्थानाची डागडजी होत नाही. ती आम्हालााच स्वखर्चाने करावी लागतात. पावसाळ्यात घरांना गळतीलागते अशा अनेक तक्रारीचा पाढा महिलांनी समितींसमोर
मांडल्या. तेव्हा समिती प्रमुख खोतकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या संबधी विचारले असता सार्वजनीक बांधकाम विभागाकडून दर तीन वर्षांनी दुरूस्ती केली जाते. मात्र अपुरा निधी मिळतो. ६ कोटीचा निधी गरजेचा असताना दीडच कोटी रूपय मिळाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान कार्टरची दुरूस्तीच केली जात नसल्याचे सांगण्यात आल्याने संबधीत अधिकाऱ्यांना समितीतील सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले होते.
एसआरपीएफ मधील निजाम कालिन घरांच्या पाहणी दरम्यान समितीमधील सदस्य ही आवक झाले. या वेळी महिलांनी आम्हाला पाणीही अशुद्ध मिळत असल्याच्या तक्रारी केल्या. जलवाहिनीला जागो जागी गळती लागल्याने पालिकेकडून अशुद्ध पाणी येते तेव्हा आ. खोतकर यांनी जर जलवाहिनी दुरूस्तीसाठी आमदार फंडातून पाच लाख रूपये
देतो.
पाण्याचा प्रश्न सोडवा असे सांगितले. तसेच आज पर्यंत आमच्या वसाहतीची कोणत्याही राजकीय नेत्यांनी पाहणी केली नाही. तुम्ही पहिल्यादांज आलात आता आमच्या निवास स्थानाचा प्रश्न सोडवा असे काही महिलांनी यावेळी सांगितले. तसेच पोलिस प्रशिक्षण विद्यालयासही भेट देवून तेथील समस्या जाणुन घेतल्या.
या दौऱ्यात जिल्हाधिकारी ए.एस. आर नायक, निवासी जिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपविभागीय अधिकारी श्रीकु मार चिंचकर, तहसीलदार रेवननाथ लबडे, जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आरपीटीएसचे प्राचार्य संभाजी कदम, उपअधीक्षक गौर, गुन्हे शाखेचे अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जालना नगर पालिकेच्या आवारात समितीमधील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. अर्जुन खोतकर म्हणाले या समितीला विधी मंडळाचे अधिकार दिलेले आहे. सत्कारही आम्ही घेवू शकत नाही. मात्र आग्रहा खातर सत्कार घेतला. जालना पालिकेकडे यापूर्वी असलेली नगरोथ्थान योजना रद्द करण्यात आलेली आहे. त्या एवजी अटल अमृत योजनेत पालिकेचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा. या योजनेतून पाणी, भूमीगत गटार, गार्डन, रस्ते आदीं विकास कामे करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.

Web Title: Jalalalika will get the Atal Amrut Yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.