पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून जलसमाधी आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:07 AM2021-03-13T04:07:35+5:302021-03-13T04:07:35+5:30

टाकळी जीवरग, निमखेडा व पेंडगाव हा रस्ता वाहतुकीसाठी चालू असतांना अचानक महिन्याभरापूर्वी गट नंबर ४७ मधील एका शेतकऱ्याने या ...

Jalasamadhi agitation suspended at the request of police administration | पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून जलसमाधी आंदोलन स्थगित

पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून जलसमाधी आंदोलन स्थगित

googlenewsNext

टाकळी जीवरग, निमखेडा व पेंडगाव हा रस्ता वाहतुकीसाठी चालू असतांना अचानक महिन्याभरापूर्वी गट नंबर ४७ मधील एका शेतकऱ्याने या रस्त्यावर चारी खोदून काट्या टाकून सदरील रस्ता पूर्णतः बंद केला आहे. शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता सुरळीत करण्यात यावे. अन्यथा शुक्रवारी गिरीजा नदीवरील केटीकम पुलावरून जलसमाधी घेऊ, असा इशारा तहसील प्रशासनाकडे नागरिकांनी दिला होता. त्याप्रमाणे शुक्रवारी जलसमाधी घेण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या शेतकऱ्यांना मात्र वडोदबाजार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी रोखले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, त्यासाठी जलसमाधी कोणी करू नये, असे आवाहन केले. तहसीलच्या वतीने मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांनी पंचनामा केला. हा अहवाल तयार करून तहसीलदार यांना कळविण्यात येईल, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

Web Title: Jalasamadhi agitation suspended at the request of police administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.