जलदिनी ग्रा. पं.तर्फे शुद्ध पाणी पुरवठ्याला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:05 AM2021-03-24T04:05:36+5:302021-03-24T04:05:36+5:30

खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांकडून एका जारचे वीस ते पंचवीस रुपये आकारणी केली जाते. त्यामुळे गोरगरीब जनतेला ते न परवडणारे ...

Jaldini g. Commencement of pure water supply by Pt | जलदिनी ग्रा. पं.तर्फे शुद्ध पाणी पुरवठ्याला प्रारंभ

जलदिनी ग्रा. पं.तर्फे शुद्ध पाणी पुरवठ्याला प्रारंभ

googlenewsNext

खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांकडून एका जारचे वीस ते पंचवीस रुपये आकारणी केली जाते. त्यामुळे गोरगरीब जनतेला ते न परवडणारे आहे. परिणामी शुद्ध पाण्यापासून जनतेला वंचित राहावे लागते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गावातील रेणुका देवी मंदिर प्रांगणात बोअरवेल असून पाणी मुबलक आहे. या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाचा संच बसवून जागतिक जलदिनी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच कारभारी नलावडे, माजी सरपंच भीमराव नलावडे, सदस्य पोपट काटकर, अरुण गायकवाड, शोभाबाई नलावडे, स्वाती काटकर, पुंजाजी नलावडे, ग्रामविकास अधिकारी बनसोड, कमलाकर नलावडे, कल्याण काटकर, राजू नलावडे, कर्मचारी बबन नलावडे, दगू सोनवणे आदींची उपस्थिती होती.

फोटो : बाजारसावंगी येथे सरपंच आप्पाराव नलावडे यांच्या हस्ते शुद्ध पेयजलचे उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Jaldini g. Commencement of pure water supply by Pt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.