जळगावच्या महापौरपदाची निवडणूक कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 07:08 AM2021-03-17T07:08:43+5:302021-03-17T07:09:43+5:30
राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून घेतल्या. मग जळगाव महापालिका अपवाद कशासाठी, असा प्रश्नही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
औरंगाबाद : जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ऑनलाइनऐवजी सभागृहात प्रत्यक्ष मतदान घ्यावे, यासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर बुधवारी न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून घेतल्या. मग जळगाव महापालिका अपवाद कशासाठी, असा प्रश्नही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या ऑनलाइन निवडणुकीच्या घोषणेला आव्हान दिले आहे. पिंपरी चिंचवड आणि नागपूर मनपाच्या निवडणुका सभागृहात नुकत्याच झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव मनपाची निवडणूक ऑनलाइन घेणे चुकीचे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.