जालना-जळगाव रेल्वेमार्ग ‘हायस्पीड’वर, मराठवाड्यातील वर्षांनुवर्षे कागदावरील रेल्वेमार्गांचे काय?

By संतोष हिरेमठ | Published: June 29, 2023 04:31 PM2023-06-29T16:31:05+5:302023-06-29T16:31:26+5:30

मराठवाड्यातील रेल्वे विकास : घोषणा, सर्वेक्षण झालेले रेल्वेमार्ग थंड बस्त्यात

Jalna-Jalgaon railway on 'high speed', what about on paper pending railway projects in Marathwada for years? | जालना-जळगाव रेल्वेमार्ग ‘हायस्पीड’वर, मराठवाड्यातील वर्षांनुवर्षे कागदावरील रेल्वेमार्गांचे काय?

जालना-जळगाव रेल्वेमार्ग ‘हायस्पीड’वर, मराठवाड्यातील वर्षांनुवर्षे कागदावरील रेल्वेमार्गांचे काय?

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : अवघ्या वर्षभरापूर्वी हवाई सर्वेक्षण झालेल्या जालना-जळगाव या नव्या ब्राॅडगेज रेल्वेमार्गासाठी ३,५५२ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. या नव्या रेल्वेमार्गामुळे मराठवाड्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीत वाढ होईल; मात्र मराठवाड्यातील वर्षानुवर्षे कागदावरील रेल्वेेमार्गांचे काय, त्यांना कधी ‘हाय स्पीड’वर आणले जाईल, असा सवाल आहे.
वर्षांनुवर्षे रेल्वे प्रश्नांसाठी झगडणाऱ्या मराठवाड्याला गेल्या दोन वर्षांत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लागत असल्याचे पीटलाइन, एकेरी मार्गाचे विद्युतीकरणाच्या कामावरून दिसत आहे. ही कामे सुरू झाली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनमाड-परभणी या एकेरी मार्गाचे विद्युतीकरणाचे काम वेगात सुरु आहे; पण अनेक मार्ग अजूनही लाल फितीत अडकले आहेत.

हे मार्ग २५ वर्षांपासून कागदावरच
रोटेगाव-कोपरगाव आणि छत्रपती संभाजीनगर-दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव लोहमार्ग मार्गी लागण्याची २५ वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे. या रेल्वेमार्गांसाठी सर्वेक्षणही झाले.

छत्रपती संभाजीनगर - अहमदनगर रेल्वे मार्ग कधी ?
छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरचा रेल्वे प्रवास करण्यासाठी मनमाडमार्गे जवळपास ११३ किलोमीटरचा अधिक प्रवास करावा लागतो. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर हा ११५ कि.मी. चा लोहमार्ग मंजूर झाला; परंतु अजूनही तो कागदोपत्रीच आहे. तो गतीने पूर्ण करण्याची गरज आहे

या रेल्वे मार्गांकडेही लक्ष द्या
- लातूर रोड - नांदेड.
- बाेधन - लातूर रोड.
- गुलबर्गा - लातूर रोड.
- परळी - मानवत रोड व्हाया पाथ्री.
- श्रीरामपूर- नेवासा- शेवगाव-गेवराई-परळी.
- सोलापूर-तुळजापूर व्हाया पैठण-छत्रपती संभाजीनगर-जळगाव.
- जालना- खामगाव

छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव रेल्वे मार्ग व्हावा
लातूर-पानगाव बायपास झाला पाहिजे आणि गंगाखेडला जोडला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर - दौलताबाद-चाळीसगाव मार्गही मार्गी लागावेत.
- अरुण मेघराज, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ

लवकर भूसंपादन व्हावे
मुख्यमंत्र्यांनी गतवर्षी छत्रपती संभाजीनगर - अहमदनगर या ११५ कि.मी. रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी १,५८५ कोटी मंजूर केल्याची घोषणा केली होती. लवकर भूसंपादन होऊन हा मार्ग व्हावा.
- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

अनेक मार्ग प्रलंबित
गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील बरेच रेल्वेमार्ग रेंगाळलेले आहेत. हे मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
- मोतीलाल डोईजोडे, सदस्य क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती

Web Title: Jalna-Jalgaon railway on 'high speed', what about on paper pending railway projects in Marathwada for years?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.