जि.प.वर मात करीत जालना पोलीस चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:59 AM2019-03-11T00:59:14+5:302019-03-11T00:59:39+5:30

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर रविवारी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीस संघाने जि.प. संघावर मात करीत विजेतेपद पटकावले. अष्टपैलू कामगिरी करणारा विजय जाधव सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.

Jalna Police Champion defeating ZP | जि.प.वर मात करीत जालना पोलीस चॅम्पियन

जि.प.वर मात करीत जालना पोलीस चॅम्पियन

googlenewsNext

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर रविवारी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीस संघाने जि.प. संघावर मात करीत विजेतेपद पटकावले. अष्टपैलू कामगिरी करणारा विजय जाधव सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
जिल्हा परिषद संघाने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकांत ८ बाद १८१ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून विजय सोनवणे याने २६ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह ३२ आणि संजय गिते याने २ चौकारांसह २९ व अमोल खरातने २२ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ३१ धावांची खेळी केली. अरुण अल्हाडने २0 धावांचे योगदान दिले. जालना पोलीसकडून विजय जाधवने ३0 धावांत ३, बाळू बडुरेने २ व निरंजन चव्हाण व मनोज काळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जालना पोलीसने विजयी लक्ष्य २३ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून प्रल्हाद बकले याने ४४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३, ज्ञानेश्वर सानप याने ४ चौकार व एका षटकारासह ४४, मांगीलाल राठोडने २६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४१ व विजय जाधवने १३ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद १९ धावा केल्या. जि.प.कडून कर्णधा प्रदीप राठोड, आरेफ सय्यद यांनी प्रत्येकी २, तर विजय सोनवणे याने १ गडी बाद केला. बक्षीस वितरण जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम, महेंद्र गिरगे, पंकज जाधव, सीताराम पवार, महेंद्रसिंग कानसा, सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन पाटील, विवेक येवले, दीपक जावळे, संजीव बालय्या आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचे मानकरी
सामनावीर : विजय जाधव
मालिकावीर : अब्दुल वहीद
फलंदाज : मिलिंद पाटील
गोलंदाज : सतीश श्रीवास
यष्टिरक्षक :सचिन पाटील

Web Title: Jalna Police Champion defeating ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.