जालनारोड बनला धोकेदायक; सीएनजी पाईपलाईन बुजविण्यातील हलगर्जीपणाने रोजच अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 01:02 PM2022-07-01T13:02:49+5:302022-07-01T13:05:01+5:30
जड वाहने रोडच्या बाजूला घेतले बाजूच्या खड्ड्यात फसून अपघात होत आहेत
- श्रीकांत पोफळे
करमाड (औरंगाबाद) : मागील काही महिन्यांपूर्वी जालनारोडच्या बाजूने गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. ती बुजवत असताना दबाईकरणाचे काम योग्य प्रकारे न झाल्यामुळे जालना रोडच्या बाजूला पाईपलाईनवरील रस्ता खचलाअसून तीन ते चार फुटापर्यंत नाल्या पडलेल्या आहे. शेंद्रा, टाकळी व वरूड काजी फाट्यावर खड्ड्यांचे प्रमाण सर्वाधिक असून जड वाहने रोडच्या डाव्या बाजूला घेतली तर या नालीत फसून वाहनांचे नुकसान होऊन अपघात होत आहेत. यामुळे जालना रोडवरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वी औरंगाबाद-जालना महामार्गाला लागून सीएनजी गॅस ऑनलाईन पुरवठा होण्याच्या दृष्टीने गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. औरंगाबाद जालना महामार्गावरील पेट्रोल पंपावर २४ तास सीएनजी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, हे करत असताना संबंधित ठेकेदाराने पाइपलाईन बुजविण्याच्या कामाचे दबाईकरण योग्यरीत्या न केल्यामुळे जालना रोडवरील या भागात रोजच अपघात होत आहेत.
मोठ - मोठी जड वाहने थांबवण्यासाठी रोडच्या डाव्या बाजूला वाहने उभी करावी लागतात. तसे केले तर काही कळायच्या आत. वाहने या नालित फसून जात आहे. चार दिवसांूर्वी ४० विद्यार्थी घेऊन जाणारी एक शाळेची बस देखील शेंद्रा पाटीवरील नालीत फसली होती.मात्र सदैवणे त्यात कोणालाही इजा झालेली नाही. या पाईपलाईनचे काम होत असतानाच जवळपास 15 जणांचे बळी गेलेले आहे. आता पुन्हा तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकासह पंचक्रोशीतील नागरिक करत आहे.