जालना रोड पुन्हा उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:03 AM2017-08-22T01:03:27+5:302017-08-22T01:03:27+5:30

जालना रोड शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने अक्षरश: वाहून गेला आहे.

Jalna road reclaimed | जालना रोड पुन्हा उखडला

जालना रोड पुन्हा उखडला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहराच्या वाहतुकीची जीवनरेखा असलेला जालना रोड शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने अक्षरश: वाहून गेला आहे. आकाशवाणीसमोर केलेले सीलकोट वाहून गेल्याने रोड खड्डेमय झाला आहे. रोडखालील पूर्ण खडी उखडल्यामुळे रोडवर कच साचला आहे. त्यामुळे मोपेड व दुचाक्या घसरत आहेत.
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात जालना रोड मोंढानाका ते सिडको उड्डाणपुलापर्यंतच्या पट्ट्यात उखडला होता. रोडवरील पूर्ण खडी उघडी पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला आदेशित केले होते. आॅक्टोबरनंतर त्या रोडचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले होते. अवघ्या आठ महिन्यांत ते डांबरीकरण मागील दोन दिवसांच्या पावसाने उखडले आहे.
त्या रोडची डिफर्ड लायबिलिटी कंत्राटदाराकडे शिल्लक आहे की नाही, याबाबत शहर विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता ऋषिकेश खंडेलवाल यांना विचारले असता ते म्हणाले, लायबिलिटी पिरीयडमध्ये तो रोड असू शकतो.
रोडची पाहणी करून त्याची तातडीने डागडुजी करण्यात येईल. कोणकोणत्या भागात पावसाने रोडवरील डांबरीकरण वाहून गेले आहे, त्याची सोमवारी पाहणी केल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Jalna road reclaimed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.