जालना स्टील कंपनीतील दुर्घटनेत मृतांची संख्या ६ वर; उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:24 PM2020-03-06T12:24:15+5:302020-03-06T13:39:26+5:30

तप्त लोहरस अंगावर पडल्याने झाली दुर्घटना

Jalna Steel Company accident death toll rised to 5; Two died during treatment in Aurangabad Hospital | जालना स्टील कंपनीतील दुर्घटनेत मृतांची संख्या ६ वर; उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू

जालना स्टील कंपनीतील दुर्घटनेत मृतांची संख्या ६ वर; उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद/जालना : औद्योगिक वसाहतीतील ओम साईराम या स्टील कंपनीत तप्त लोहरस अंगावर पडून जखमी झालेल्या तिघांचा शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी झालेल्या या भीषण दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता तर अन्य नऊ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

ओम साईराम या स्टील कंपनीत गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान भट्ठीतील तप्त लोहरस एका बकेटमधून क्रेनव्दारे वाहून नेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यात तांत्रिक बिघाड होऊन ती बकेट क्रेनमधून तुटून खाली पडल्याने त्यातील तप्त लोहरस कंपनीत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडला. यात तीन जणांचा भाजून मृत्यू झाला. अन्य नऊ जण जखमी झाले होते त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात अधिक उपचार सुरु होते. यातील तीन कामगारांचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या ६ वर गेली आहे. 

Web Title: Jalna Steel Company accident death toll rised to 5; Two died during treatment in Aurangabad Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.