जालना पालिकेतर्फे राबविणार प्रधानमंत्री आवास योजना!

By Admin | Published: April 15, 2017 11:47 PM2017-04-15T23:47:42+5:302017-04-15T23:48:25+5:30

जालना : जालना नगर पालिकेतर्फे शहरात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येणार असून, चार प्रवर्गातील घटकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

Jalna will implement the Prime Minister's housing scheme by the corporation! | जालना पालिकेतर्फे राबविणार प्रधानमंत्री आवास योजना!

जालना पालिकेतर्फे राबविणार प्रधानमंत्री आवास योजना!

googlenewsNext

जालना : जालना नगर पालिकेतर्फे शहरात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येणार असून, चार प्रवर्गातील घटकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याबाबतचे काम निविदा प्रक्रिया टप्प्यावर असून, लवकरच याचे काम सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घर या उपक्रमातून प्रधानमंत्री आवास योजना शहरात पालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होणार असून, १ मेपासून पारदर्शक अंमलबजावणी होणार असल्याचे नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सांगितले. झोपडपट्ट््या आहत्ो, तेथेच त्यांचा पुनर्विकास करणे, कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटक, खाजगी भागीदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वैयक्तिक स्वरुपाततील घरकुल बांधण्यास अनुदान या चार प्रवर्गाद्वारे पालिकेच्या वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे. २०२२ पर्यंत शहरात ४५ हजार घरांचे उद्दिष्ट या योजनेंतर्गत ठेवण्यात आल्याचे नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस माजी आ. कैलास गोरंट्याल, एजन्सीचे अशोक अग्रवाल, राम सावंत, विनोद यादव यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Jalna will implement the Prime Minister's housing scheme by the corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.