जमीर कादरी यांचे नगरसेवकपद रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:43 AM2017-08-02T00:43:03+5:302017-08-02T00:43:03+5:30
आरेफ कॉलनी वॉर्ड क्रमांक १९ मधून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक जमीर कादरी यांचे छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्यामुळे मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी त्यांचे नगरसेवकपद सोमवारी रद्द केले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आरेफ कॉलनी वॉर्ड क्रमांक १९ मधून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक जमीर कादरी यांचे छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्यामुळे मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी त्यांचे नगरसेवकपद सोमवारी रद्द केले. त्यांनी नगरसेवकपदाच्या काळात घेतलेले सर्व फायदे त्वरित जमा करावेत, असेही आयुक्तांनी आदेशात बजावले आहे.
कादरी यांनी एमआयएमच्या तिकिटावर आरेफ कॉलनी या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वॉर्डातून निवडणूक लढविली होती. निवडणूक आयोगाला त्यांनी छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर वाहेद अली यांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कादरी यांच्या जात प्रमाणपत्राची जिल्हा जात पडताळणी समितीने नव्याने पडताळणी करावी, असे आदेशित केले होते. समितीने दोन दिवसांपूर्वीच कादरी यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविले.