औरंगाबादेतील ‘आॅरिक ’मध्ये जपानी उद्योग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:14 AM2018-06-21T00:14:35+5:302018-06-21T00:17:20+5:30
दिल्ली येथे झालेल्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर सेमिनारमध्ये जपानी कंपन्यांना दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ४५ जपानी कंपन्यांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे आॅरिक सिटीमध्ये जपानी उद्योग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिल्ली येथे झालेल्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर सेमिनारमध्ये जपानी कंपन्यांना दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ४५ जपानी कंपन्यांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे आॅरिक सिटीमध्ये जपानी उद्योग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘डीएमआयसी’अंतर्गत शेंद्रा येथे औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी उभी राहते आहे. याठिकाणी उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम गतीने सुरू आहे. सुमारे ९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. पायाभूत सुविधांचे ९५ टक्के काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गत आठवड्यात ८ औद्योगिक भूखंड वाटपातून तब्बल ८१ कोटी २८ लाख रुपयांची उलाढालझाली. भारतीय कंपन्यांबरोबर परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आॅरिक सिटी महत्त्वपूर्ण ठरत आहे. एकूण ४३ भूखंड वाटप झाले आहेत. दिल्लीत झालेल्या सेमिनारमध्ये सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी जपानी कंपन्यांसमोर आॅरिक सिटीविषयी सादरीकरण केले. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी जपान दौऱ्यात जगप्रसिद्ध कंपनीसह सहा उद्योगांशी आॅरिकमध्ये गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली होती. काही महिन्यांपूर्वीच आॅरिक सिटी प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपान आणि कोरियन कंपनीच्या शिष्टमंडळाने पाहणी केली होती. आता दिल्लीमध्येही ‘आॅरिक’विषयी जपानी कंपन्यांना सादरीकरण करण्यात आले.